घरमहाराष्ट्रभावी पिढी महाराष्ट्रात दुष्काळ बघणार नाही; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

भावी पिढी महाराष्ट्रात दुष्काळ बघणार नाही; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Subscribe

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपल्या सर्वांकरिता आनंदाची गोष्ट आहे की, पंतप्रधान मोदींनी 2017 साली साईभूमी येथे विकासकामांचे भूमीपुजन केले होते. आम्ही त्यावेळी उपस्थित होतो.

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदी 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ देतील आणि निळवंडे धरणाचे जलपूजन करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पासह विविध योजनांचा आराखडा विस्तृतपणे सांगितला.(Future generation will not see drought in Maharashtra Fadnavis expressed his belief)

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज आपल्या सर्वांकरिता आनंदाची गोष्ट आहे की, पंतप्रधान मोदींनी 2017 साली साईभूमी येथे विकासकामांचे भूमीपुजन केले होते. आम्ही त्यावेळी उपस्थित होतो. त्याच कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होतेय ही आनंदाची गोष्ट आहे. जगभरातून साईभक्त येथे सातत्याने येतात. त्यांच्याकरिता अनेक व्यवस्था आणि समाजपयोगी म्हणजेच शिक्षणापासून आरोग्यापर्यंत विविध उपक्रम याठिकाणी करण्यात येतात. त्या साईभूमीतील विकासकामांचे आज उद्घाटन करण्यात आल्याने याचा लाभ साईभक्तांना नक्कीच होणार असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

- Advertisement -

माझ्या जन्माआधी सुरू झाला होता निळवंडे प्रकल्प

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या विकासकामांबरोबरच सर्वात मोठी गोष्ट म्हणजे निळवंडे सारखा प्रकल्प. या प्रकल्पाची सुरुवात माझ्या जन्माआधी झाली होती. माझा जन्म या प्रकल्पानंतर झाला. त्या प्रकल्पाचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झाले तेव्हा येथील लोकांना या प्रकल्पासाठी किती वर्ष वाट पहावी लागली हे यातून दिसते. मला सांगताना आनंद होतो की, 2016-17 मध्ये हा प्रकल्प गतीने पूर्ण होण्यासाठी मान्यता आणि आर्थिक मदत दिली. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधात असतानाही त्यांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे आम्ही तेव्हा करू शकलो. आज शिंदे यांच्या नेतृत्वात आज त्या प्रकल्पाचे उद्घाटन तुमच्या हस्ते होतेय याचा आम्हाला आनंद होतोये असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा : सबका साथ, सबका विकास मोदींच्या प्रशासनाचा मंत्र; अजित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

सिंचनासाठी 30 हजार कोटी केंद्राने दिले

पुढे बोलताना फडवणीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंचनासाठी मागील नऊ वर्षांत 30 हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे आम्ही सिंचनाचे एवढे प्रकल्प राबवू शकलो. यासोबतच केंद्र सरकार ज्या प्रमाणे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू आहे त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही आता महाराष्ट्रात नमो किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. त्याचेही उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल्याने आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
रेल्वेसह अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले.

हेही वाचा : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते AC दर्शन रांगेचे लोकार्पण

…तर महाराष्ट्रात दुष्काळ पडणार नाही

एकच विनंती आहे की, महाराष्ट्रातील 50 टक्के क्षेत्र दुष्काळी भाग आहे. या भागात पाऊस होत नाही. त्या भागात जोपर्यंत आपण पाणी नाही पोहोचवत तोपर्यंत महाराष्ट्राला लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही. त्यामुळे तुमच्या नेतृत्वात पश्चिमेकडील नद्यांचे पाणी जे की, समुद्रात जाते ते गोदावरीच्या खोऱ्यात आणून नगरपासून मराठवाड्य़ापर्यंत नेऊन संपूर्ण महाराष्ट्र आपण सुजलाम सुफलाम करू शकतो. त्याचा पूर्ण आराखडा आपण तयार केला आहे. त्यासोबतच विदर्भातील वैनगंगा नदीतील 100 टीएमसी पाण्यापैकी 67 टीएमसी पाणी विदर्भातील दुष्काळी भागातून आणून नळगंगेपर्यंत आणून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, आणि उत्तर महाराष्ट्र या तिन्ही विभागाना आपण दुष्काळमुक्त करू शकतो. त्यासाठी आपली मदत हवी आहे. या प्रकल्पांसाठी केंद्रानेही थोडी-थोडी मदत करावी, जेणे करून आमच्या पिढीने शेतकरी आत्महत्या बघितल्या आहेत. परंतू भावी पिढी महाराष्ट्रात दुष्काळ बघणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -