घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, युवकाने उचलले टोकाचे पाऊल

मराठा आरक्षणाचा आणखी एक बळी, युवकाने उचलले टोकाचे पाऊल

Subscribe

मराठा आंदोलक आरक्षणासाठी आपला जीव देत असल्याने खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात चार मराठा आंदोलकांनी पाच दिवसांत आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे, अशी तीव्र भूमिका मकाठा समाजाकडून घेण्यात आली आहे. मराठा आंदोलक मराठा मनोज जरांगे पाटील यांनी 17 दिवस उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्याकडे महिन्याभराची मुदत मागत त्यांचे हे आंदोलन मागे घेतले. पण महिन्याभराचा वेळ देऊन देखील सरकारने याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने कालपासून (ता. 25 ऑक्टोबर) पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, कोणीही भावनेच्या भरात आत्महत्या करू नये, अशी विनंती जरांगे यांच्याकडून करण्यात आली आहे. पण असे असतानाही काही मराठा आंदोलक आरक्षणासाठी आपला जीव देत असल्याने खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात चार मराठा आंदोलकांनी पाच दिवसांत आत्महत्या केली होती. त्यानंतर आज पुन्हा एका मराठा आंदोलकाने आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे. (Youth commits suicide in Hingoli for Maratha reservation)

हेही वाचा – …तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता; सदावर्तेंवर निशाणा साधताना शिंदे गटाचे वादग्रस्त विधान

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शेवाळा शिवारात मराठा समाजातील एका तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय वर्ष 23) असे या तरुणाचे नाव आहे. “मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे.” अशा आशयाची चिठ्ठी लिहित तरुणाने आत्महत्या केल्याचे माहिती उघडकीस आली आहे. नवनाथ हा देवजणा येथील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सध्या सोयाबीन कापणी व काढणीचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे नवनाथ कल्याणकर हा ट्रॅक्टरवर काम करत होता. सकाळपासून तो परिसरातील शेवाळा शिवारात काम करण्यासाठी गेला होता. पण यावेळी चालू असलेल्या मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होते, तेव्हा मजूरांनी नवनाथला आवाज दिला. मात्र आवाज दिल्यानंतरही नवनाथ कल्याणकर काहीच प्रतिसाद देत नसल्याने मजूरांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी नवनाथचा शोध घेतला असता एका झाडाला गळफास लावला असल्याच आढळून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

नवनाथने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस येताच गावकऱ्यांनी याबाबतची माहिती आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांच्या पथकाला दिली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली असता नवनाथ याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. नवनाथ हा मराठा आरक्षणात सक्रिय सहभाग घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा हा गेल्या काही दिवसातील पाचवा बळी आहे. मराठा आंदोलक आरक्षणाची मागणी करत आत्महत्या करत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ज्यामुळे आता मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -