घरमहाराष्ट्रसबका साथ, सबका विकास मोदींच्या प्रशासनाचा मंत्र; अजित पवारांची प्रतिक्रिया

सबका साथ, सबका विकास मोदींच्या प्रशासनाचा मंत्र; अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (26 ऑक्टोबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज शिर्डीमध्ये जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. या दौऱ्यात मोदी 86 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ अतंर्गत लाभ दिला. सोबतच निळवंडे धरणाचे जलपूजन करून राज्यात कालव्याचे जाळे पसरवले. या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सबका साथ, सबका विकास मोदींच्या प्रशासनाचा मंत्र असल्याचे वक्तव्य केले आहे. (Sabka Saath Sabka Vikas is the mantra of Narendra Modis administration Ajit Pawars reaction)

अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकोबा विठ्ठल ते शिर्डीचे साईबाबा भक्तांना दिशा दाखवण्याचं काम केल आहे. फक्त जेव्हा भक्त धार्मिक स्थळी माथा टेकून धन्य होतात, भक्तीत विलीन होतात, तेव्हा ते एक नवी ऊर्जा, चैतन्य घेऊन जात असतात. प्रत्येक किलोमीटर अंतरावरून आलेल्या भक्तांना मंदिरात आल्यानंतर आंतरिक शक्तीनं तर ऊर्जा प्राप्त होतंच असते. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आजच्या भेटीतून लोक कल्याणाचं काम करण्यासाठी हीच ऊर्जा मिळो. अशी प्रार्थना मी आज या प्रसंगी करतो.

- Advertisement -

हेही वाचा – गरीबांचा विकास हाच खरा समाजिक न्याय; निळवंडे धरणाचे जलपूजन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया

साईबाबांनी सर्व समुदायासाठी एक मंत्र दिला आहे, तो म्हणजे ‘सबका मालिक एक’ याचा अर्थ असा आहे की, सर्व जगाचं कल्याण करणारा ईश्वर एकच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 साली या देशाचं पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर ‘सबका साथ सबका विकास’ ही घोषणा करून त्यांच्या प्रशासनाचा मंत्र त्या घोषणेमार्फत लोकांच्या पुढं ठेवला होता. मला वाटतं या घोषणेमधील प्रेरणा साईबाबांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्राप्रमाणेच गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची त्यांची जर आपण पाहिली तर ते या घोषणेच्या मार्गानेच देशाला पुढं नेत असल्याचं आपल्याला सगळ्यांना पावलोपाल पावली जाणवत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रानं कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा छातीचा कोट करून महाराष्ट्र राष्ट्रासोबत उभा राहिला आहे. हा इतिहास आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वेळोवेळी मांडली होती. आणि त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदी आणि विकास हे समीकरण घट्ट झाल आहे. त्यामुळेच विकास हा समान धागा असल्याने आम्ही सर्वजण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे संयुक्त नेतृत्व या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे. आज अनेक महत्वाच्या  प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.

हेही वाचा – अजितदादांसमोरच मोदींची शरद पवारांवर टीका; म्हणाले- ‘त्यांनी’ शेतकऱ्यांसाठी काय केले?

तुमच्या माझ्या बळीराजाचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा आहे. मला आठवतंय माझा आजोळ नगर जिल्हा असल्यामुळे 53 वर्ष कितीतरी वेळा धरणाचं नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं. निवडणूका आल्या की नारळ फोडायचा? आणि लोकांना सांगायचं की आता आम्ही निळवंडे करणार. बघता बघता तीन पिढ्या निघून गेल्या. साडे आठ टीएमसी धरण पावणे दोन लाख एकर क्षेत्र ओलिताखाली आणणाऱ्या धरणाचं आताच मोदींनी उद्घाटन केले. त्यांनी तिथे पाणी सोडत असताना आम्हाला सांगितले की, बाबांनो पाणी हे महत्वाचं आहे ठिबकचा वापर करा. पाण्याची जेवढी बचत करता येईल तेवढी करा. तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना ते पाणी मिळणार आहे. खूप जणांचं जमीन, जुमला, घरं, दारं त्या निळवंडे गेली त्यावेळेस बाकीच्यांना पाणी मिळणार आहे.

जवळपास 182 गावांना हे पाणी देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून, जलसंपदाच्या माध्यमातून याठिकाणी होत आहे. अनेक चढ-उतार आपण या बाबतीमध्ये बघितले, परंतु एकदाच हे धरण पूर्ण पण झालं. एका कॅनेलचं कामं झाल असून दुसऱ्या कॅनेलचं काम साधारण डिसेंबरला पूर्ण होईल. परंतु 53 वर्षांपूर्वी कुणाला वाटलं नसेल की, हे धरण आता आपल्याला सुरू करायचं आहे. कारण हे धरण पूर्ण होण्याचं आणि त्याचा शुभारंभ करण्याचं निश्चितपणे नरेंद्र मोदींच्या हातामध्ये होतं. त्याच्यामुळे इतका काळ या धरणाला पूर्ण व्हायला लागला. ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. खरंतर एकंदरीतच ही सगळी धरणं होत असताना आपण योग्य प्रकारची पिकं घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा – फित कापून खुशाल श्रेय घ्यावे, कारण…; निळवंडे धरणावरून राष्ट्रवादीचा पंतप्रधान मोदींना खोचक टोला

आज रेल्वेच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प पाण्याच्या संदर्भातले वेगवेगळे महत्वाचे प्रकल्प साईबाबांच्या दर्शनाच्या करता लाखोंचा समुदाय येतो त्यांना चांगल्या प्रकारचा सुविधा देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली, देवेंद्र फडणवीस असतील, आम्ही सगळे असू. आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून समाजाच्या सर्व जाती धर्माचे भले करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज आपण पाठीमागच्या काळामध्ये स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी शेतकऱ्यांना पाचशे रुपये महिना देण्याचा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदेंच्या सरकारने महिना 500 रुपये असे आता आपण साधारण शेतकऱ्याला 12 हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एक फुल ना फुलाची पाकळी हे देण्याचं काम आहे.

आम्ही हे जरी देत असलो तरी याच्यातून पेक्षा शेतकऱ्यांनी कष्टानी केलेला जो माल आहे. धान्य, फळ पिकं किंवा वेगवेगळा भाजीपाला, फुलं आहेत. याला चांगला दर देण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर चाललेला आहे. आम्ही पण महाराष्ट्राला त्याच रस्त्याने नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. याची पण ओळख आपण सगळ्यांनी ठेवावी. शून्य टक्के व्याज आणि तीन लाखापर्यंत पीक कर्ज एक रुपयामध्ये पीक विमा असे कितीतरी महत्वाचे निर्णय आपण या महाराष्ट्रातल्या जनतेकरता घेतलेले आहेत. पुढे देखील मोदींच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याकरता प्रत्येक व्यक्तीला हे सरकार माझाही विचार करत आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनातून, कृतीतून दाखवण्याचं काम आम्ही सगळेजण त्याठिकाणी करण्याचा निश्चय केलेला आहे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -