घरताज्या घडामोडीधक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! सोलापुरात रिक्षाचालकांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार

Subscribe

सोलापुरात रिक्षाचालकांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुण्यात Acid फेकण्याची धमकी देत एका शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु असून १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; पीडित मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत असून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली होती. ही रडत बसलेली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे मुलीच्या चौकशीतून समोर आले आहे. याप्रकरणी आरोपींवर पोलिसांनी पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केला आहे. तसेच पाच जणांना अटक केली असून इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुणे : पतीच्या संमतीने पत्नीवर बलात्कार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -