घरट्रेंडिंगनिर्भया जिंदाबाद... ए पी सिंह मुर्दाबाद...

निर्भया जिंदाबाद… ए पी सिंह मुर्दाबाद…

Subscribe

दिल्ली निर्भया प्रकरणात चार जणांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर तिहार जेलबाहेरच ए पी सिंह मुर्दाबादच्या घोषणा सुरू झाल्या. दिल्लीतल्या तिहार जेलबाहेर परिसरात शहीद भगतसिंह मार्गावर मोठ्या प्रमाणात आज दिल्लीकरांनी गर्दी केली होती. दोषींना फाशी होताच लोकांना एकच जोषात निर्भया जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. पण त्याचवेळी ए पी सिंह मुर्दाबाद अशाही घोषणा झाल्या. चारही दोषींसाठी वकील असणाऱ्या ए पी सिंह यांच्या नावे या घोषणा होत होत्या. जशी फाशी झाल्याची बातमी लोकांनी कळली तशा या घोषणांनी तिहार जेल परिसर दुमदुमून गेला. तिहारच्या गेट नंबर ३ च्या बाहेर ही गर्दी झाली होती. लोकांनी सेलिब्रेशन करून आपआपसात मिठाईदेखील वाटली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नका अशा सूचना असतानाही आज लोकांनी मोठ्या प्रमाणात तिहार जेलबाहेर गर्दी केली होती. निर्भयाच्या निमित्ताने लोकांनी आपली एकजूट दाखवण्यासाठी ही गर्दी केली होती. वाढत्या गर्दीमुळेच दिल्ली पोलिसांनीही या परिसरात बंदोबस्त वाढवला. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी जेल प्रशासनानेही कडक बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisement -

दिल्लीत चालत्या बसमध्ये अमानुष पद्धतीने महिलेवर बलात्कार करणाऱ्या निर्भया प्रकरणातील मुकेशकुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंग चारही दोषींना आज सकाळी ५.३० वाजता अखेर फाशीची शिक्षा देण्यात आली. बलात्काऱ प्रकरणातील दोषींनी कडक शिक्षेची चपराक म्हणून आजच्या फाशीच्या शिक्षेने समाजासमोर एक उदाहरण ठेवले आहे. आजच्या फाशीमुळे तब्बल ७ वर्षे ३ महिन्यानंतर या प्रकरणात निर्भयाला न्याया मिळाला अशीच भावना उमटली.


हे ही वाचा – Its Time : निर्भया तुझा न्याय झाला, चारही दोषी फासावर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -