घरमहाराष्ट्रब्रेकअप केलेल्या प्रेयसीचा प्रियकराने घेतला बदला

ब्रेकअप केलेल्या प्रेयसीचा प्रियकराने घेतला बदला

Subscribe

ब्रेकअप झालेल्या तरुणाने घेतला तरुणीचा बदला.

प्रेमासाठी वाटेल ते करण्याची बऱ्याच जणांची तयारी असते. मग प्रेमाकरता एखादी व्यक्ती कोणत्याही थराला जाते. असाच एक प्रकार पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. एका तरुणाचे एका १८ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांचे फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर वरुन बोलणे सुरु होते. दोघही एकमेकांवर प्रेम करत होते. मात्र त्यांचे हे प्रेम जास्त दिवस टिकले नाही. हे प्रेमप्रकरण तरुणीच्या घरी कळले आणि तिने त्या तरुणाशी ब्रेकअप केला. मात्र ब्रेकअप केलेल्या प्रेयसीचा त्या तरुणांने बदला घेतला.

असा घेतला ब्रेकअपचा बदला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१८ वर्षीय तरुणी पुण्यात शिक्षण घेत आहे. तर संबंधित आरोपी हा गोंदिया येथे राहतो. दोघे ही एकमेकांना ओळखत होते. मात्र ते गेल्या काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हाट्सअॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. चॅटिंग करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी एकमेकांचे फोटो देखील शेअर केले. परंतु त्यांचं हे प्रेम जास्त दिवस टिकल नाही. त्यांच प्रेम प्रकरण तरुणीच्या घरच्यांना समजल. घरातल्यांचता विरोध असल्याने त्या तरुणीने तिचा प्रियकर अनिकेतला घडलेला प्रकार सांगितला. तिने घरातून विरोध आहे त्यामुळे मी ब्रेकअप करत असल्याचे अनिकेतला सांगितले. अनिकेतला हे सहन झाले नाही तो हताश झाला होता. याच रागातून त्याने इन्स्टाग्रामवर संबंधित तरुणीच्या नावाने बनावट अकाउंट तयार केले. त्या तरुणीच्या अकाऊंटवरु त्या तरुणाने त्या तरुणीचे काही फोटो एडिट करुन अश्लील फोटो तयार करुन पोस्ट केले. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. हे फोटो पाहिल्यानंतर तरुणीला धक्काच बसला. याप्रकरणी संबंधित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तरुणा विरोधात फिर्याद दिली असून अनिकेतवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शोध घेत असून अद्याप तरुणाला अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

वाचा – महिलेला अश्लिल ‘व्हाट्सअॅप-मेसेज’ पाठवणा-यांना अटक


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -