घरमहाराष्ट्रआमच्या हाती सत्ता द्या सगळे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढू; बच्चू कडूंचे...

आमच्या हाती सत्ता द्या सगळे प्रश्न सहा महिन्यात निकाली काढू; बच्चू कडूंचे वक्तव्य

Subscribe

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, चार ते पाच मुद्दे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात यांच्यात समन्वय राहणे गरजेचे आहे.

मुंबई : ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दाखविण्याचे काम केले तोच महाराष्ट्र आज वेगळ्या वळणावर जात असल्याचे चित्र आहे. पण प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. असे असतानाच आमच्या हाती सत्ता द्या सहा महिन्यांत सगळे प्रश्न निकाली काढू असे थेट वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी (22 नोव्हेंबर) रोजी केले. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. (Give power to us we will solve all the problems in six months Statement of Bachu Kadu)

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, चार ते पाच मुद्दे घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. मुख्यमंत्री आणि जरांगे यांच्यात यांच्यात समन्वय राहणे गरजेचे आहे. तीच भूमिका आमचीसुद्धा आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. कुठेच धर्माच्या, जातीच्या नावानं भडकवण्याचे प्रयत्न केले जाऊ नये, अशांतता माजू नये, म्हणून आम्ही जरांगे आणि भुजबळांची भेट घेऊन त्यांना भूमिका मांडा पण वैयक्तिक होऊ नका असे सांगण्याचे प्रयत्न करू. तर प्रत्येक पक्षाची आप-आपली भूमिका आहे, ती प्रत्येक पक्षाने मांडली पाहीजे. पण येथे नेते भांडतात पण खालच्या कार्यकर्त्याचं मरण होतं, पण राजकीय लोक याचाच फायदा घेतात. जिथे गरम आहे तिथे कॅटली ठेवण्याचा प्रयत्न केल्या जातो. हीच राजकारण्याची जात आहे असे म्हणत त्यांनी राज्यातील राजकारण्यांवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा : सनातनचा काहींकडून अपप्रचार केल्या जातोय; धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमातून फडणवीसांचा हल्लाबोल

फडणवीस यांना बागेश्वर बाबा महत्वाचे वाटत असतील

आज पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबांच्या दिव्य दरबाराता हजेरी लावली. याबाबत विचारले असता बच्चू कडू म्हणाले की, बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर तो विषय संपला आहे. फडणवीस यांना बागेश्वर बाबा महत्वाचे वाटले असतील. प्रत्येकाची आपली एक भूमिका असते पण ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र वेगळ्या वळणार जातो की काय असे वाटू लागले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Telangana Elections 2023: अकबरुद्दीन ओवैसींनी मंचावरून पोलिसांना दिली धमकी

राज ठाकरेंना प्रतिसाद भेटणार नाही

राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आर्थिक निकषावर आरक्षण देण्यात यावे अशी भूमिका घेतली असून, त्यानुसारच ते पुढे जाणार आहेत याबाबत कडू यांना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे यांना यावर काहीच प्रतिसाद मिळणार नाही. राज ठाकरेंनाही हे माहित आहे. राज ठाकरेंना हेसुद्धा माहित आहे की, लोकं कुठे पेटतात? लोक जातीच्या, धर्माच्या नावाने पेटतात. पण शेतकऱ्यांनी धुऱ्यावर टेंबा जरी लावला तरी काहीच पेटत नाही. राज ठाकरे म्हणतात ना की, आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं पण आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना, मजुरांना आर्थिक आरक्षण द्यावं त्यासाठी आमच्या हाती सत्ता देणं गरजेचं असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -