घरमहाराष्ट्रतुमच्या एकाही कॉलेजला सावित्रबाईंचं नाव का नाही? जरांगेंचा नाशिकमध्ये भुजबळांना थेट सवाल

तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रबाईंचं नाव का नाही? जरांगेंचा नाशिकमध्ये भुजबळांना थेट सवाल

Subscribe

मच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही? असा सवाल करत त्यांनी भुजबळांना नाशिकमध्येच घेरले.

नाशिक: मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात टोकाचा वाद सुरु आहे. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये झालेल्या ओबीसी समाजाच्या सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार हल्ला केल्यानंतर आता जरांगे आणि भुजबळ यांच्यात वार-पलटवार सुरू आहेत. (Maratha reservation Why is none of your colleges named Savitrabai Phule Manoj Jarange Patil asked Chhagan Bhujbal directly in Nashik)

जरांगे पाटील यांनी बुधवारी, (22 नोव्हेंबर) नाशिकमध्ये महाराष्ट्र सदर घोटाळ्यातील सहभागाबद्दल भुजबळांवर सडकून टीका केली. तसंच, तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुले यांचं नाव का नाही, असा थेट सवालही केला आहे.

- Advertisement -

सावित्रीबाईंचं नाव का नाही?

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, म्हाताऱ्या माणसाने आता बोलू नये, जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या मग बघतो. यााचं आपल्याला सगळं माहिती आहे. आड येऊ नको. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही? असा सवाल करत त्यांनी भुजबळांना नाशिकमध्येच घेरले.

मनोज जरांगे छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले की, कुठे भाजी विकत होते, कोणाच्या इथे काय करत होते, मुंबईला येऊन काय केले, कोणत्या नाटकात काम केले, कोणत्या चित्रपटात काम केले आणि कुणाचा बंगला हडप केला हे सगळे मला माहित आहे. त्यांनी मराठी जनतेचे खाल्ले. महाराष्ट्र सदनातील जनतेचा त्यांनी खाल्ला. त्यामुळे त्यांना गोरगरीब जनतेचा तळतळाट लागला आणि ते तुरुंगात गेले. त्यांना तुरुंगात बेसण भाकर खावी लागली, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.

- Advertisement -

मराठा समाजाची हानी होऊ देऊ नका

सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी म्हटले की, मराठा समाज प्रचंड संख्येने जमला आहे, याचे मनापासून कौतूक. मात्र, या गर्दीच्या नादात आपल्या हातून काहीही चुकीचं व्हायला नको. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज एकवटला आहे, पण गर्दीच्या नादात अतिउत्साहात येऊ नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो की, पुन्हा समाजाची हानी होईल. त्यामुळे आता समाजाची हानी होऊ देऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सभेला उपस्थित मराठा समाजाला केले.

(हेही वाचा: फोटोच्या आधारावर इमेज खराब करता येत नाही, कॅसिनोतील आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -