घरताज्या घडामोडीसरकार वेळेवर निर्णय घेत नाही; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा घरचा आहेर

सरकार वेळेवर निर्णय घेत नाही; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा घरचा आहेर

Subscribe

'पैशांची अडचण येत नाही. मात्र प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेवर पूर्ण होत नाही. याची कधी कधी खंत वाटते. म्हणून माझे प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असते', असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले.

‘पैशांची अडचण येत नाही. मात्र प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेवर पूर्ण होत नाही. याची कधी कधी खंत वाटते. म्हणून माझे प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असते’, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने आयोजित केलेल्या ‘NATCON 2022’ या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी या कार्यक्रमातील उपस्थितांना संबोधित करताना गडकरी हे विधान केले. तसेच, ‘विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेताना सरकार वेळेवर निर्णय घेत नाही’, असेही विधान करत नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. (government does not take timely decisions says union minister nitin gadkari in natcon 2022)

या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधिताना गडकरी यांनी सरकारवर निशाणा साधला. “आमच्याकडे पैशांचा प्रोब्लेम नाही. बँका वाटेल तेवढे कर्ज देण्यास तयार आहेत. परंतु, मानसिकतेचा प्रश्न असून, पैसा उभा राहतो. तसेच, प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेवर पूर्ण होत नाही. याची कधी कधी खंत वाटते. म्हणून माझे प्राधान्य हे प्रकल्प आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असते”, असे शब्दांत गडकरी यांनी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली.

- Advertisement -

“भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. टोलमधून वर्षाला 40 हजार कोटी उत्पन्न मिळते. 2024 पर्यंत हेच उत्पन्न 1 लाख 40 हजार कोटीच्या जवळपास असेल. बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व असून, वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. पण सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे, की सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मेटरीयलला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, त्याची किंमत कमी करणे शक्य होईल”, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

दरम्यान, भाजपाच्या नव्या संसदीय समितीची घोषणा 4 दिवसांपूर्वी करण्यात आली. या समितीमधून नितीन गडकरी यांचे नाव वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

आगामी मार्ग आणि वेळेचा अंदाज

  • दिल्ली ते चंदीगड अडीच तास
  • दिल्ली ते देहरादून 2 तास
  • दिल्ली ते हरिद्वार 2 तास
  • दिल्ली ते जयपूर 2 तास
  • दिल्ली ते मेरठ 40 मिनिटे
  • दिल्ली ते कटरा जवळपास 6 तास
  • दिल्ली ते अमृतसर 4 तास
  • दिल्ली ते श्रीनगर 8 तास
  • दिल्ली ते मुंबई 12 तास
  • चेन्नई तेबेंगलोर 2 तास
  • लखनौ ते कानपूर 35 मिनिटे

हेही वाचा – लालबाग-परळमध्ये गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -