घरताज्या घडामोडीपोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, अटकेची शक्यता

पोलिसांना धमकी दिल्याप्रकरणी इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, अटकेची शक्यता

Subscribe

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी काल शनिवारी एका भाषणादरम्यान पाकिस्तानी पोलीस आणि न्यायाधीशांना धमकी दिल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढत झाली आहे. त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने तत्काळ इम्रान खान यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. तसेच पोलिसही कायदेशीर कारवाई करण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांनी PEMRA नुसार घटनेच्या कलम 19 चे उल्लंघन केले. इम्रान खान देशाच्या लष्कर, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांची भाषणं द्वेष पसरवणारी आहेत, त्यामुळे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटकेची शक्यता आहे.

- Advertisement -

पाकिस्तानचे पोलीस कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्या पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत, असं इम्रान खान इस्लामाबादमधील F9 पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅलीदरम्यान म्हणाले. एवढेच नाही तर खान यांनी एका महिला न्यायाधीशावर पक्षपाती असल्याचा आरोप केला आणि बघून घेण्याची धमकी दिली.

इम्रान खान यांच्या जवळचे मित्र शाहबाज गिल यांना पोलिसांनी 9 ऑगस्टला अटक केली होती. गिल एका आलिशान कारमधून इम्रान खान यांच्या घरी बनीगाला येथे जात होते. त्यांनी यापूर्वीही पाकिस्तानी लष्कर आणि न्यायव्यवस्थेबाबत अत्यंत वाईट विधाने केली होती.

- Advertisement -

हेही वाचा : अतुल सावे मागून येऊन मंत्री झाले, आमच्याकडेही बघा; संजय शिरसाटांची नाराजी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -