घरCORONA UPDATEपुण्यात ग्राहक पेठेचा उपक्रम, वस्तूवर ‘स्वदेशी’ आणि ‘विदेशी’च्या पाट्या!

पुण्यात ग्राहक पेठेचा उपक्रम, वस्तूवर ‘स्वदेशी’ आणि ‘विदेशी’च्या पाट्या!

Subscribe

आपल्याला ठाऊकच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मोहिमेचा नारा दिला आहे.  त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्राहकपेठेत असलेल्या सगळ्या स्टॉल्सवर स्वदेशी आणि विदेशी अशा पाट्या स्टिकर्स रुपाने लावण्यात आल्या आहेत. स्वदेशी वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या जाव्यात यासाठी आम्ही हे सुरु केल्याचं ग्राहक पेठेने स्पष्ट केलं.

- Advertisement -

सध्याच्या घडीला भारत आणि चीन या दोन देशांमधले संबंध तणावाचे झाले आहेत. एवढंच नाही तर चीन आणि अमेरिका यांचेही वाद चव्हाट्यावर आले आहेत. कोरोनामुळे चीनची प्रतिमा जागतिक पातळीवर डागाळली आहे. अशा सगळ्या प्रकरणात चीनमधल्या वस्तूंची खरेदी कमी व्हावी आणि भारतीय वस्तू यांची खरेदी वाढावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत.

अनलॉक १ मध्ये पुण्यातल्या ग्राहक पेठेत स्वदेशी आणि विदेशीची पाट्या लावण्यात आल्या आहेत. अनेक ग्राहकांना स्वदेशी उत्पादनं कोणती आणि विदेशी उत्पादनं कोणती?  हे समजत नाही. ते ग्राहकांना लक्षात यावं आणि त्यांनी जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादनं घ्यावीत भारतीय पदार्थ ग्राहकांनी जास्तीत जास्त घ्यावेत असाही उद्देश आहे. पुण्यातल्या ग्राहक पेठेत स्वदेशी आणि विदेशी अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. ग्राहकांना अनेकदा स्वदेशी वस्तूंची खरेदी करायची असते. मात्र स्वदेशी वस्तू कोणत्या ते ओळखता येत नाही. त्या वस्तू त्यांना ओळखता याव्यात आणि जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला चालना मिळावी म्हणून आम्ही स्टिकर्स लावल्याचं त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

हे ही वाचा – अल्पवयीन मुलीला वकिलाने ऑफिसमध्ये बोलवून केला बलात्कार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -