घरमहाराष्ट्रक्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

क्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन

Subscribe

कर्जत तालुक्यातील मानिवाली येथे 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनानिमित्त मानिवली येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच नेरळ हुतात्मा चौकातही नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व अन्य मान्यवरांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.

9 ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त पंचायत समिती कर्जत, ग्रुप ग्रामपंचायत मानिवली, हुतात्मा स्मारक समिती मानिवली व केंद्र दहीवली मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानिवली गावातील हुतात्मा स्मारकाच्या प्रांगणात क्रांतीदिन सोहळ्याचे आयोजन करणात आले होते. प्रथम मानिवली गावचे सुपुत्र वीर हिराजी गोमाजी पाटील, वीरभाई कोतवाल, शहीद भगत मास्तर या क्रांतीवीरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्मारकातील प्रतिमांना पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले.

- Advertisement -

त्यानंतर आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी कर्जत पंचायत समितीचे सभापती राहुल विशे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, नायब तहसीलदार संजय भालेराव, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, कामगार नेते विजय मिरकुटे, अरविंद पाटील, वसंत कोळंबे, सरपंच प्रवीण पाटील, हुतात्म्यांचे नातेवाईक, ग्रामसेवक, पोलीस अधिकारी कर्मचारी, पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्याार्थी आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -