घरमुंबईकाळाचौकीत दुमदुमणार विठुरायाचा गजर

काळाचौकीत दुमदुमणार विठुरायाचा गजर

Subscribe

मुंबईसह राज्यभरात सध्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यासाठी मुंबईतील अनेक गणेशोत्सव मंडळाने आपली जय्यत तयारी सुरू केली आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सवमध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवणार्‍या काळाचौकी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात यंदा गणेशोत्सवादरम्यान विठुरायाचा गजर दुमदुमणार आहे. यंदा मंडळाने आकर्षक देखावा म्हणून प्रति पंढरपूरचा देखावा उभारण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे या देखाव्याला साजेशी अशी विठ्ठलरुपी गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

कला दिग्दर्शक अतुल फाडले यांच्या संकल्पनेतून यंदा या ठिकाणी काळाचौकी येथे पंढरपूर अवतरणार आहे. त्याला साजेशी अशी काळाचौकीच्या महागणपतीची गणेश मूर्ती देखील साकारणार आहे प्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांच्या कलेतून यंदा विठ्ठल रुपी काळाचौकीचा महागणपती साकारणार आहे. तब्बल 18 फूट उंच अशी ही गणेशाची मूर्ती मुंबईकरांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. याबरोबरच या मूर्तीचे वैशिष्ट जपण्यासाठी मंडळाकडून आणखीन एक वेगळा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह अमन दळवी यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

याबद्दल अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष विजय लपारे म्हणाले की, यंदा काळाचौकीत पंढरपूर अवतरणार आहे, यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे पंढरपूरच्या वारी मध्ये जे विठुरायाचे भक्त सहभागी होतात, तेदेखील अकरा दिवस गणरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत.मुंबईसह उभ्या महाराष्ट्रात गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मुंबईत विशेषत: लालबाग-परळ विभागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आकर्षक देखावा आणि उंच मूर्ती हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. यात लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांच्यासह काळाचौकीचा महागणपती या गणपतींचा प्रमुख आकर्षण ठरतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -