घरक्राइमहरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेले, वाट चुकून जंगलात अडकून पडले; एकाचा मृत्यू

हरिश्चंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेले, वाट चुकून जंगलात अडकून पडले; एकाचा मृत्यू

Subscribe

नाशिक : प्रचंड धुके, वारा, पाऊस असे चित्र असताना पुणे जिल्ह्यातील बरूचा खडी क्रेशर कंपनीत नोकरी करणारे सहा मित्र हरिशचंद्र गडावर निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेण्यासाठी १ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आले. मात्र, निसर्ग संकटापुढे त्यांचा निभाव लागला नाही. थंडीत कुडकुडून एक तरुण मृत्यू पावला तर दुसरा श्वास कोंडल्याने बेशुद्ध झाला.  आज दुपारी सहा जणांना राजूर येथे आणले. त्यातील अनिल उर्फ बाळू गीते (वय ३२) याचे राजूर ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पाच तरुणांवर राजूर येथील डॉ. टी. एन. लांडे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बरूचा खडी क्रेशर कंपनी, वाघोली (पुणे ) येथे चालक म्हणून काम करत होते .त्यात मृत अनिल उर्फ बाळू नाथराव गीते (वय ३२),अनिल मोहन आंबेकर (वय ३३), गोविंद दत्तात्रय आंबेकर (वय ३५),तुकाराम आसाराम तिपाले (वय ४०), हरिओम विठ्ठल बोरुडे (१६) ,महादू जगन भुतेकर (वय ३८) हे सर्व तरुण हरिशचंद्र गडावर ट्रेकिंगसाठी गेले. त्याठिकाणी अचानक धुके वाढल्याने त्यांची वाट चुकली. ते सर्वजण त्याच ठिकाणी अडकून पडले. त्यातील अनिल गीते या तरुणाचा थंडीत कुडकुडून मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

दोन दिवसापूर्वी हरिशचंद्र गडावर जायचे नियोजन झाले. खाजगी गाडीने ते पाचनई गावात दुपारी तीन वाजता पोहचले गडाची कोणतीही माहिती नसताना हे तरुण धुके वारा, मुसळधार पाऊस असताना व अंगावर पावसाची तोडके कपडे घालून गडाच्या मध्यावर गेल्यावर त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये फोटो काढून आनंद व्यक्त करत असताना गडावर धुके मोठ्या प्रमाणात वाढलं. त्यामुळे एकमेकांस कुणीच दिसत नव्हते त्यामुळे चकवा बसून ही तरुण जंगलात जिथे वाट मिळेल तिथे जाऊ लागले त्यामुळे त्यांची रात्र जंगलात गेली सकाळी दहा वाजता थोडे धुके ओसरला नि पाऊस सुरु झाला मात्र थंडीमुळे त्यात अनिल गीते याचे शरीर कडक झाले. मोबाईल रेंज नसल्याने बंद पडले बॅटरी उतरली मग आणखीनच तरुण जंगलात भरकटत गेले. ते आरडा ओरडा करत होते.

गाईड असलेले बाळू रेंगडे यांना मुंबईहुन एका ग्रुपने फोन करून या घटनेची माहिती दिली. रेंगडे यांनी रात्रीच त्यांचा शोध घेत त्यांच्या पर्यंत पोहचले. एकाचा मृत्यू झाल्याचे पाहून त्या तरुणांना एक झाडाच्या आडोशाला बसवून तो गावात गेला व ग्रामस्थ वन मजुर महादू भांगरे, विजय नाडेकर,गौरव मेमाने शरद भांगरे यांना घेउन या तरुणाची सुटका केली त्याच वेळी घटनेची माहिती कळताच वनविभागाचे डी .डी.पडवळ यांनी गुरुवारी सकाळी मृतदेहासह सहा जणांना राजूर येथे आणले व त्यांच्यावर उपचार सुरू केले त्यात दोघांची तब्येत जास्त असल्याने त्यांच्यावर डॉ लांडे यांनी यशस्वी उपचार केले.

१ तारखेला हरिशचंद्र गडावर गेलो होतो मात्र आम्हाला चकवा बसला रस्ता चुकला दोन दिवस जंगलात चाचपडत राहिलो. त्यात आमचा अनिल थंडीने कडक होऊन मृत पावला. गाईड बाळू रेंगडे भेटले नसते तर आमच्यातील एकही वाचला नसता,असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट करून दिली. : गोविंद आंबेकर, पर्यटक तरुण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -