घरमहाराष्ट्रहसन मुश्रीफांचा 'तो' घोटाळा उघडकीस आणण्यासाठी किरीट सोमय्या करणार पुण्याचा दौरा

हसन मुश्रीफांचा ‘तो’ घोटाळा उघडकीस आणण्यासाठी किरीट सोमय्या करणार पुण्याचा दौरा

Subscribe

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा चालवून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल असं म्हटलं होतं. त्यानुसार, किरीट सोमय्या हे शुक्रवारी पुण्याला जाणार असून आहेत. तसंच, 'हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल', असं ट्विट करत सोमय्या यांनी म्हटलं.

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बड्या नेत्यांचे घोटाळे समोर आणत आहेत. नुकताच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर हातोडा चालवून आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा नंबर असेल असं म्हटलं होतं. त्यानुसार, किरीट सोमय्या हे शुक्रवारी पुण्याला जाणार आहेत. तसंच, ‘हसन मुश्रीफ यांच्यासंदर्भात हा दौरा असेल’, असं ट्विट करत सोमय्या यांनी म्हटलं.

”श्री हसन मुश्रीफ सेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना घोटाळा कारवाई साठी माझा उद्या शुक्रवार १ एप्रिल रोजी पुणे दौरा असेल. दुपारी ४.३० वाजता आयकर आयुक्त इंवेस्टीगेशन पुणे आयकर सदन, सॅलिसबरी पार्क तर ५.३० वाजता रजिस्ट्रार ऑफ कंपनीस पुणे PCNTDA ग्रीन बिल्डिंग, आकुर्डी याठिकाणी असेन”, असं किरीट सोमय्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

- Advertisement -

”हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हसन मुश्रीफ यांचे कुटुंब आणि सेनापती घोरपडे कारखाना यांच्या विरोधात भारत सरकारने पुणे न्यायालयात याचिका दाखल केली. फसवणूक, शेल आणि बनावट कंपन्यासाठी कलम 447 आणि 439 कंपनी कायदा आणि तपास IPC/CRPC कलम 256 अन्वये कारवाईची मागणी केली आहे”, असं किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

काय आहे हसन मुश्रीफांवरील आरोप

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाच्या जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीला १५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रातील २७००० ग्राम पंचायतीचे TDS रिटर्न पुढच्या १० वर्षांपर्यंत जयोस्तूते मॅनेजमेंट प्रायवेट लिमीटेड कंपनी फाइल करणार आणि त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला दरवर्षी जवळपास ५०,००० रुपये द्यावे लागणार होते.

यासंबंधी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. तसंच त्यांनी माध्यमांसमोर हा विषय आणला होता. मुश्रीफ यांनी अपारदर्शकपणे १० मार्च २०२१ रोजी हे १० वर्षांचे कंत्राट दिल्याचे पुरावे सोमय्यांनी दिले होते. सप्टेंबर महिन्यात त्यांनी माहिती उघडकीस आणाली होती. जयोस्तूते मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीची स्थापना २०१२-१३ मध्ये झाली. हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन यांनी ही कंपनी ८ महिन्यांपूर्वीच विकत घेतली. मात्र या कंपनीला मागील ८ वर्षात काहीच आवक नव्हती. तसंच सन २०१९-२० मध्येही कंपनीची उलाढाल शून्य होती. यानंतरसुद्धा संबंधित कंपनीला कंत्राट दिल्यानं सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला.


हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, पत्नी आता आपल्या पूर्व पतीला देणार दरमहा 3 हजार पोटगी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -