घरमहाराष्ट्रजोरदार पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम; लोकल 10 मिनिटे उशिराने

जोरदार पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम; लोकल 10 मिनिटे उशिराने

Subscribe

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. मुंबईसह उपनगर आणि पश्चिम उपनगरामध्ये पावसाची जोरदार बँटींग पाहायाला मिळत आहे. त्यामुळे रेल्वे 10 मिनिटे उशिराने धावत आहेत.

शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. राज्यासह मुंबईतील अनेक भागात सध्या पावसाचा जोर कायम आहे. मुंबईतील दादर, परळ, सीएसएमटी, सायन तर मुंबई उपनगरामधील घाटकोपर, भांडूप, कांजूर मार्ग, डोबिंवली, अंबरनाथ, कल्याण, ठाणे भागात देखील पावसाचा जोर पाहायाला मिळत आहे. शिवाय पश्चिम उपनगरातील अंधेरी, विलेपार्ले, बोरिवली, वसई-विरारमध्ये देखील पावसाची जोरदार बँटींग सुरू आहे. मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेसेवेवर देखील झाला आहे. तिनही मार्गावरच्या रेल्वे १० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुसळधार पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना कामावर जाताना काहीशा त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. मुसळधार पावसाने हिंदमाता, किंग्ज सर्कल परिसरातही पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच अडचण झाली आहे. आज दिवसभर मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबईकरांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पश्चिम उपनगरांमधील काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाचा जोर आठवडाभर कायम

पावसाचा जोर आठवडाभर कायम राहणार असून, येत्या २४ तासांत जोरदार सरी कोसळतील. असा, अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  दादर, लोअर परळ, माहिम, वांद्रे भागात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. दक्षिण मुंबईतील कुलाबा, फोर्ट परिसरात देखील पावसाचा जोर कायम असून, वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे.

- Advertisement -

राज्यातील अनेक भागांमध्ये वरूण राजाची कृपा

कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. कोकणात देखील मागील दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र सध्या कोकणात पाहायाला मिळत आहे. गोवामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासामध्ये पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वरूण राजाचा जोर पाहून बळीराजा देखील सुखावला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -