घरताज्या घडामोडीWeather Update : पुण्याजवळील ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस, लोणावळ्यात 137 मिमीची नोंद

Weather Update : पुण्याजवळील ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस, लोणावळ्यात 137 मिमीची नोंद

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पुण्याजवळील ताम्हिणी घाटात मुसळधार पाऊस पडला असून 24 तासांत 230 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर लोणावळ्यात 137 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील ताम्हिणी घाट आणि लोणावळ्यात 22 जुलै रोजीही चांगला पाऊस लागला होता. त्याचप्रमाणे मावळातील शिरगाव येथे 170 मिमी इतका पाऊस झाला.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. हवामान खात्याने 23 जुलैला जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 24, 25 आणि 26 जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे. घाट परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळे घाट परिसरात जाताना काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं आहे. 24 जुलै ते 29 जुलै पर्यंत पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

सध्या राज्यामध्ये बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये महागाव तालुक्यात आज पर्यंतचा सर्वाधिक पाऊस पडल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे. जोरदार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून त्यामुळे अनंतवाडी गावाला पुराचा वेढा बसल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये आत्तापर्यंत प्रशासनाकडून 110 लोकांना वाचविण्यात आलेले आहे तर अनंतवाडी या गावातील जवळपास 20 घरे वाहून गेल्याने या गावातील लोकांना शासनाकडून हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु खराब हवामानामुळे मदत कार्यात अडथळे येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. अनंतवाडी गावाला पुराचा वेढा बसल्याने यामध्ये जनावरे देखील वाहून गेल्याची माहिती समोर आलेली आहे.


हेही वाचा : Monsoon 2023 : राज्यात पावसाचा धुमाकूळ, ‘या’ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -