Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा; 2 कोटींची खंडणी दिल्यावर झाली होती सुटका...

हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा; 2 कोटींची खंडणी दिल्यावर झाली होती सुटका…

Subscribe

नाशिक : नाशिक येथील नामवंत बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे शहरातील इंदिरानगर परिसरातील राहत्या घराबाहेरुन 2 सप्टेंबरला रात्री 9:30 वाजेच्या सुमारास अपहरण करण्यात आल्याने खळबळ एकच उडाली होती. सुदैवाने दुसऱ्याच दिवशी सकाळी ते गुजरात राज्यातील वलसाड – सूरत महामार्गावर असल्याचे समजले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दुपारी घरी सुखरुप आणले. मात्र, त्यांच्या अपहरणाबाबतचे गूढ कायम होते. त्यांच्या अपहरणामागे अंतरराज्य टोळी असल्याचा संशय नाशिक पोलिसांना होता. त्यानुसार पोलिसांनी आपला तपास सुरूच ठेवला. अखेर, हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अपहरणामागे गुजरात राज्यातील टोळी असल्याचे समोर आले आहे. त्याहून धक्कादायक बाब अशी की पारख यांना खंडणीची रक्कम घेतल्यानंतर सोडण्यात आले होते. (Nashik builder Hemant Parakh kidnaping Case)

हेमंत पारख घरी सुखरूप परत आले असले तरी अपहरणात परराज्यातील टोळीचा समावेश असल्याचा संशय नाशिक पोलीसांना होता. त्यामुळे त्या अनुषंगाने तपास पुढे सुरू ठेवण्यात आला. तपासासाठी गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यात विशेष पथके रवाना करण्यात आली होती. अखेर तपासाअंती पारख यांचे अपहरण खंडणीसाठी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते. खंडणीची रक्कम ताब्यात मिळाल्यानंतर त्यांना वलसाड – सूरत महामार्गावर सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात राजस्थान येथील टोळीचा समावेश असल्याचे समोर आले आहे. मात्र, संपूर्ण अपहरणाचा मास्टरमाइंड नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान पोलिसांच्या एका पथकाने मागील काही दिवसापासून राजस्थान मधील जोधपुर येथे तळ ठोकलेला होता. तिथूनच संशयित महेन्द्र उर्फ नारायणराम बाबूराम बिष्णोई, पिंटू उर्फ देविसींग बद्रीसिंग राजपूत, रामचंद्र ओमप्रकाश बिष्णोई यांना ताब्यात घेण्यात आले आहे. महत्वाचं म्हणजे या अपहरण प्रकरणात मास्टरमाईंड हा इगतपुरी तालुक्यातील लहांगेवाडी येथील अनिल भोरु खराटे असल्याचे समोर आले. नाशिकच्या खराटे यानेच गुन्ह्याचा कट रचला, हेमंत पारख यांच्या बाबत सगळी माहिती पुरविली होती, असेही निष्पन्न झाले. पोलिसांनी संशयितांकडून खंडणी स्वरूपात मागितलेल्या 2 कोटी रक्कमेपैकी एक कोटी 33 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच बोलेरो कॅप्मर गाडी, देशी बनावटीचा कट्टा, सहा जिवंत राउंड असा 8 लाख 32 हजार 500 रुपये असा एकूण 1 कोटी 41 लाख 32 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

काय होता घटनाक्रम 

हेमंत पारख यांच्या व्यावसायिक भागीदार अक्षय धैर्यसिंग देशमुख, यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती की, त्याचे पार्टनर हेमंत पारख यांचे राहते घरासमोरून अनोळखी इसमांनी पिस्टलचा धाक दाखवुन त्यांना गाडीत बळजबरीने फोर व्हिलर गाडीत टाकुन अपहरण करून त्यांना दोन कोटी रूपयाची खंडणी मागितली होती. यावरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपासासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमून तपास सुरु केला होता. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी , यांसह इतर तांत्रिक माहीतीच्या आधारे संशयित हे राजस्थानच्या जोधपूर भागातील असल्याची माहीती मिळाली. तसेच संशयित महेंद्र बिष्णोई याने त्याचे राजस्थान येथील साथीदार यांच्या मदतीने हेमंत पारख अपहरण करून खंडणी उकळल्याचे तपासात निष्पन्न झाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -