घर महाराष्ट्र अजित पवार गटातील 'या' नेत्याने उपस्थित केले राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न, म्हणाले...

अजित पवार गटातील ‘या’ नेत्याने उपस्थित केले राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न, म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. असे असले तरी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसल्याचे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु आता अजित पवार गटातील एका नेत्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

मुंबई : दोन महिन्यांपूर्वी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसपक्षामध्ये मोठा भूकंप झाला. अजित पवार यांनी पक्षातील काही आमदारांसमवेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. असे असले तरी राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडली नसल्याचे शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याकडून सांगण्यात येत आहे. परंतु या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना आपण एकच आहोत, हे विसरून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच अजित पवार गटातील एका नेत्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. वर्षातील 180 दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीतच होता. मग आजपर्यंत दिल्लीत साधा 1 नगरसेवक निवडून आणता आला नाही, अशी टीका अजित पवार गटाचे प्रवक्त उमेश पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. ( Ajit Pawar group spokesperson Umesh Patil raised questions on the party leadership of NCP)

हेही वाचा – ब्रिटिश पंतप्रधानांनी दिली उद्धव ठाकरेंबाबतची महत्त्वाची माहिती, मुख्यमंत्री शिंदेंचे गंभीर आरोप

- Advertisement -

यावेळी बोलताना अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले की, सुप्रिया सुळे या उत्कृष्ट संसदपटू आहेत, दरवर्षी त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळतो. याचा अर्थ असा इंग्रजी आणि हिंदीवर चांगले प्रभुत्व असल्याने आणि शरद पवार नावाचे वलय त्यांच्यासोबत आहे. याचा वापर करून हा पक्ष किमान दिल्लीत तरी वाढायला हवा होता. वर्षातील 180 दिवस खासदार म्हणून तुम्ही दिल्लीतच होता. मग आजपर्यंत दिल्लीत साधा 1 नगरसेवक निवडून आणता आला नाही.

राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्ही सांगायचे. राष्ट्रीय पातळीवर कुठेतरी मिझारोम, त्रिपुरा इथे त्यांच्या पातळीवर खासदार पक्षाचे चिन्ह घेऊन निवडून येणार, केरळमध्ये 1-2 आमदार येणार. गोव्यात पक्ष संपून गेला. महाराष्ट्रात हेलफाटे मारत बसण्यापेक्षा देशभर फिरून पक्ष वाढवला असता तर आज पक्ष खूप मोठा झाला असता. माझे पक्षावर प्रेम आहे म्हणून मला वाटते. ज्यांचे व्यक्तिमत्व राष्ट्रीय स्तरावर स्वीकारार्ह आहे, शरद पवार नावाचा पाठिंबा आहे. इतके असूनही देशभरात पक्ष वाढू शकला नाही त्याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न देखील उमेश पाटील यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

तसेच, गोवा, गुजरात, मिझारोम, नागालँड, बिहार याठिकाणी अजित पवारांनी जाऊन पक्ष वाढवायचा का? अजित पवार एकटे राज्य सांभाळायला सक्षम होते. परंतु अजित पवारांनी कष्ट केल्यानंतर यांना डोके लावायचे होते म्हणून आज ही वेळ आली आहे. आम आदमी पक्ष 2 राज्यात सत्ता मिळवतो. संपूर्ण महाराष्ट्रात आज पक्ष व्यापलेला नाही. देशाच्या पंतप्रधानपदाचे व्यक्तिमत्व असलेले शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या कर्तृत्वावर विश्वास आहे. परंतु देशभरात पक्ष वाढवला नाही. अजित पवारांची कोंडी करायची आणि अडचण करायची आणि विनाकारण आपापले फोलोअर्स वाढवायचे, अजित पवारांनी महाराष्ट्र बघितला असता तर ही अडचण आली नसती, असे थेट मत यावेळी पाटील यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

अजित पवारांवर मला प्रदेशाध्यक्ष करा अशी बोलण्याची वेळ यावी, इतके त्यांचे व्यक्तिमत्व छोटे झाले का? त्यावर एकही बोलले नाहीत. हे असे चालत नसते. प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची सावली म्हणून काम केले, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा भूमिका घेतली ज्यांनी 40 वर्ष तुमच्यासोबत काम केले. हे लोकं विरोधात राहिले नव्हते का? आत्ताच हा निर्णय घ्यायची वेळ का आली. कुवत नसलेल्या माणसाच्या हातात पक्षाची सूत्रे द्यायचा प्रयत्न झाला तर पक्ष बुडणार हे निश्चित होते. त्यामुळे पक्ष वाचवण्यासाठी अजित पवारांनी जबाबदारी घेतली, असेही प्रवक्ते उमेश पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisment -