घरमहाराष्ट्रपुण्यात गणेशोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त

पुण्यात गणेशोत्सवानिमित्त चोख बंदोबस्त

Subscribe

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवाचा प्रारंभ गुरुवारपासून होत आहे. राज्य तसेच परराज्यातून उत्सवाच्या कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येतात. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे. उत्सवाच्या कालावधीत शहरात 7 हजार पोलिसांचा खडा पहारा राहणार असून, मध्यभागात मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवानही तैनात असणार आहेत.

गणेशोत्सव बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी गेल्या महिनाभरापासून सुरू केली आहे. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधण्यासाठी पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. शहरात नोंदणीकृत 3 हजार 245 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.

- Advertisement -

दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, 15 उपायुक्त, 36 सहायक आयुक्त, 200 पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक मिळून 525 अधिकारी तसेच 7 हजार पोलीस शिपाई बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. गृहरक्षक दलाचे 500 जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या बंदोबस्तासाठी पोलिसांना मदत करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -