Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोरोनाची ऐशी तैशी, पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी

कोरोनाची ऐशी तैशी, पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी

रविवारी मात्र चौकीत एकही कर्मचारी नसल्याने पर्यटकांच्या गाड्या तेथून सुसाट जात होत्या.

Related Story

- Advertisement -

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरलेली नाही. तिसर्‍या लाटेचा सरकार जोर ओरडून सांगत आहे. असे असताना रविवारी मुंबईच्या जवळच्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. लोणावळा, खंडाळा, अलिबाग, मुरूड जंजिरा येथे पर्यटक मोठ्या संख्येने होते. तोंडाला मास्क नसणे, गर्दी करणे असे कोरोनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत होती.
रविवारची सुट्टी असल्याने पर्यटकांनी लोणावळा परिसरात एकच गर्दी केली होती. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे मात्र पर्यटक बेभान होऊन पर्यटन करत असल्याचे रविवारी टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, भुशी धरणसह इतर ठिकाणी पाहण्यास मिळाले आहे. दरम्यान, जुन्नर येथे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी लोणावळा पोलीस गेले असल्याने पर्यटनस्थळी बंदोबस्तच नव्हता. याची पर्यटकांनी संधी साधल्याचे दिसून आले.

लोणावळा शहरातून जात असताना नेहमी रायवूड चौकी येथे पोलिसांचा फौजफाटा दिसत असतो. रविवारी मात्र चौकीत एकही कर्मचारी नसल्याने पर्यटकांच्या गाड्या तेथून सुसाट जात होत्या. तसेच, सहारा ब्रिज येथे नागरिकांनी गाड्या थांबवून विनामास्क पर्यटनाचा आनंद देखील घेतला. काहीजण तर अबाल वृद्धांसह धबधब्याच्या खाली भिजण्याचा आनंद घेत होते.

- Advertisement -