घरमहाराष्ट्रसंवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात

संवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात

Subscribe

भास्कर चंदनशीव यांची खंत

सध्याच्या शिक्षणात नैतिकता हा विषयच दिसत नाही. माणसे शिकत आहेत, परंतु सामाजाचे अधःपतन होत आहे. माणासांचा एकमेकांशी संवाद होत नाही. संवाद होत नसल्यामुळे माणूसपण धोक्यात आल्याची खंत सहाव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशीव यांनी व्यक्त केली.

दोन दिवसांचे हे संमेलन तालुक्यातील कुरुळ येथे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात चंदनशिव बोलत होते. खासदार संजय राऊत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. खासदार सुनील तटकरे, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, संमेलनाचे संयोजक अ‍ॅड. सतीश बोरुळकर, स्वागताध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप पाटील, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisement -

शेतकरी शेतात राबतो, कष्ट करतो. परंतु शहारातील माणसांना शेतकर्‍यांच्या वेदना दिसत नाहीत. मराठी साहित्याला मातीचा सुगंध शेतकर्‍यांमुळे मिळाला आहे. तो सुगंध जपून ठेवण्याचे काम शेतकरी साहित्यिकांनी करावे, असे आवाहन खासदार राऊत यांनी केले. तर शेतकरी साहित्यिकांनी शेताकर्‍यांचे कान आणि डोळे बनावे, त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा राज्यकर्त्यांपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन तटकरे यांनी केले. मराठी साहित्यात व्यथा मांडल्या जात नाहीत. शेतकरी ज्या परिस्थितीत आपली हयात घालवतात त्याकडे कुणी व्यथा म्हणून पाहत नाहीत, अशी खंत खांडेकर यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, अलिबाग शहरातील शिवाजी चौकातून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -