घरताज्या घडामोडीNCP : बहुजन मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

NCP : बहुजन मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश

Subscribe

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण एकापक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. यापार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती मोर्चाच्या जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेकजण एकापक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. यापार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती मोर्चाच्या जवळपास शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात बहुजन मुक्ती मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब मिसाळ पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. (Hundreds of workers of Bahujan Mukti Morcha joined NCP Sharad Pawar faction)

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे. या पक्षाची खरी भांडवलदारी ही शरद पवार आणि त्यांची कर्तबदारी आहे. शरद पवार यांचं व्यक्तिमत्व सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. सर्वच समाजातील लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा सातत्याने पवारांचा प्रयत्न असतो. आज अनेकजण पक्ष सोडून गेले आहे. मात्र पक्ष पवारांसोबत आहे. पवारांनी फुले, शाहू, आंबेडकर, बहुजनांचा आणि बहुजन वादाचा विचार क्षणासाठी दूर केला नाही. आज देशामध्ये काय चालू आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे सक्षम विचाराचे लोक ज्यांचा पाया मजबूत आहे, अशा लोकांना पक्षात आणण्याचा प्रयत्न आमचा आहे” असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेब मिसाळ पाटील, भारती बाळासाहेब मिसाळ, रोहिदास घरत, रचना वैद्य, कैलास गायकवाड, सदानंद येवले, कल्याण दिगंबर जगदाळे, राजेंद्र बबनराव इंगोले, संतोष रोहिदास घरत, गणेश महादेव चौधरी, राजेंद्र नामदेव कवठेकर, शितल विठ्ठल खाडे, दत्ता महाराज दोन्हीपाटील, गणेश अनिल खराडे, मनोहर दत्तात्रय वाघ, तुषार नरेंद्र वाघ, शेखर मगर पाटील, सुरेश रामभाऊ डावकेर, महादेव राजमाने, सत्यनारायण काशिनाथ बिरादार, संदेश सुरेश घनबहादूर, आशिष हरिश्चंद्र जाधव, राहुल सुरेश जवळकर, मोसीनखान महमदयुसुफ खान यांचा पक्ष प्रवेश झाला आहे.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : आघाडी, महायुतीत राजकीय हालचालींना वेग; उमेदवारीसाठी बैठकांचा धडाका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -