घरठाणेआर्यन देवळेकर यांची यूपीएससी परीक्षेत तर धनंजय बांगर, शमा अनुसे यांची एमपीएससी...

आर्यन देवळेकर यांची यूपीएससी परीक्षेत तर धनंजय बांगर, शमा अनुसे यांची एमपीएससी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी

Subscribe

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत्‍ (UPSC) “CDS – 2023” व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (MPSC) “राज्यसेवा – 2022” या स्पर्धा परीक्षांमध्ये ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ठाणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (UPSC) “CDS – 2023” या स्पर्धा परीक्षेत आर्यन देवळेकर यांनी All India Rank- 54 असे दैदिप्यमान यश संपादन केलेले आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) “राज्यसेवा – 2022” च्या स्पर्धा परीक्षेत चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थीं श्री. धनंजय वसंत बांगर हे महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाने (2nd Rank in All Maharashtra State), कु. शमा अनुसे यांनी महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये अकरावा क्रमांक (11th Rank in Female All Maharashtra State), ऋतुजा पवार- उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2), रेश्मा सस्ते – उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2), आशिष खेनात – उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2) यांनी यश संपादन केलेले आहे. त्यांनी त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने व चिकाटीने आणि चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

आर्यन देवळेकर यांची मिलिट्रीमध्ये लेफटनंट या पदावर आणि धनंजय वसंत बांगर यांची उपजिल्हाधिकारी (वर्ग-1), शमा अनुसे यांची मुख्याधिकारी (वर्ग-1),  ऋतुजा पवार यांची उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2), रेश्मा सस्ते यांची उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2), कु. आशिष खेनात यांची उपशिक्षणाधिकारी (वर्ग-2) या पदावर त्यांची निवड करणेत आलेली आहे. त्यांनी मिळविलेल्या यशामुळे त्यांच्या कुंटुंबात, मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

- Advertisement -

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि इतर संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पध्दतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे. संस्थेतील एकूण 76 विद्यार्थीं प्रशिक्षणार्थींनी UPSC स्पर्धा परीक्षेत आणि 400 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी MPSC स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे.

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत विनामुल्य मार्गदर्शन मिळणेकरिता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी संस्थेच्या आगामी सन 2024 मध्ये होणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभाग नोंदवावा, तसेच प्रवेश परीक्षेच्या अधिक माहिती करिता संस्थेच्या वर्तक नगर, ठाणे येथील कार्यालयात साधण्याचे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -