घरमहाराष्ट्रमाझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही; ईडी चौकशीला हजर राहण्यापूर्वी किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य

माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही; ईडी चौकशीला हजर राहण्यापूर्वी किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य

Subscribe

किशोरी पेडणेकर आज दुपारी 12 वाजता हजर राहणार आहेत. चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही.

मुंबई: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी होणार आहेत. कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी ही चौकशी होणार आहे. किशोरी पेडणेकर आज दुपारी 12 वाजता हजर राहणार आहे. चौकशीला जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नाही.  (I am not associated with any scam Kishori Pednekar s statement before appearing before the ED investigation)

उद्धवजींच्या सोबत असलेल्यांनाच घेरण्याचं काम हा सरकारकडून सुरू आहे. ईडी वगैरे या सरकारी संस्था आहेत. त्यामुळे या संस्थांना कायम सहकार्य करायला हवं. तसंच, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिलीय की, नागरिक म्हणून आपण सहकार्य करायला हवं. जे सत्य आहे ते समोर येईलच, असा विश्वास पेडणेकरांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

किरीट सोमय्यांवर टीका…

पेडणेकर म्हणाल्या की, ज्या पद्धतीने उघडे-XXX बाबा म्हणत होते की जबाब तो देना ही पडेगा… अरे बाबा मी उत्तर तर देतेच आहे. परंतु ज्यांच्या बाबतीत तुम्ही आरोप केले होते. जे आता तुमच्या बाजूने आहेत. ते मंत्री कसे झाले? याचं उत्तर तुम्ही नागरिकांना द्यायला हवं, असं पेडणेकर म्हणाल्या.

मी मुंबईची महापौर होते मी गर्वाने सांगेन होय मी मुंबईकरांसाठी चांगलच काम केलं. त्यामुळे अशा चौकशांना सामोरं जाणं माझं काम आहे, असं म्हणत पेडणेकर ईडी चौकशीला हजर राहण्यासाठी रवाना झाल्या.

- Advertisement -

घोटाळा झाला असेल तर …

पेडणेकर म्हणाल्या की, घोटाळा जर महानगरपालिकेतील कोणत्या अधिकाऱ्यांनी किंवा कंत्राटदाराने केला असेल तर तो चौकशीतून समोर यायला हवा. मी सगळ्याच गोष्टींना पाठिशी घाला, असं म्हणणार नाही, असं पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

(हेही वाचा: प्रश्नांची उत्तरं न दिल्यामुळे बाईंनी केली शिक्षा अन् चिमुकला जीवानिशी गेला; काय आहे प्रकरण? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -