घरमहाराष्ट्रज्ञानेश्वर माऊलींच्या काळातील रेडा आता असता, तर... चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका

ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातील रेडा आता असता, तर… चित्रा वाघांची संजय राऊतांवर टीका

Subscribe

मुंबई : ठाण्यापाठोपाठ मराठवाडा आणि विदर्भातील शासकीय रुग्णालयांत 100हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत, अशी टीका सामना दैनिकातील अग्रलेखात ठाकरे गटाने केली आहे. यावरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

हेही वाचा – निर्दयी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, ठाकरे गटाची मागणी

- Advertisement -

नांदेडच्या सरकारी रुग्णालयात मृत्युसत्र सुरूच आहे. मागील 24 तासांतदेखील आणखी 14 रुग्णांचा तेथे मृत्यू झाला. मृत्यूचे हे तांडव मुंबई हायकोर्टात पोहोचले तेव्हा मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांनी सरकारच्या अनागोंदी कारभारावर नाराजी व्यक्त केली. औषधे व डॉक्टरांची कमतरता यामुळे हे मृत्यू झाले असतील तर चिंता वाटावी असाच हा विषय असल्याचे उच्च न्यायालयाने फटकारले असल्याचे ठाकरे गटाने या अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान सुरू असताना सरकार निर्दयपणे राजकारणात दंग झाले आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते. पुरोगामी महाराष्ट्राचे हे निर्दय आणि अमानुष चित्र आहे, अशी चौफेर टीका ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत, ठाकरे गटाची चौफेर टीका

त्याला प्रत्युत्तर देणारे ट्वीट भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. कोरोना काळात तुमच्या भ्रष्टाचारामुळे रेड्यांची आख्खी पलटणच महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसली होती; यमाला ओव्हरटाइम करावा लागत होता. तुमचे त्यावेळचे रेडेस्वार आम्ही खडी फोडायला पाठवलेच आहेत. लवकरच त्यांच्या बोलवित्या धन्यांच्याही मुसक्या आवळू., असे त्यांनी सुनावले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातला तो रेडा आता असता, तर रेड्यामुखी वेद वदवण्याऐवजी तुमच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या त्याच्या तोंडातून बाहेर पडल्या असत्या…, असे चित्रा वाघ यांनी खासदार संजय राऊत यांना टॅग करत म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -