घरमहाराष्ट्रमाझ्यावर शिवसैनिकांचा प्रभाव

माझ्यावर शिवसैनिकांचा प्रभाव

Subscribe

आदित्य ठाकरे.ठाकरे घराण्यातील पहिले ठाकरे ज्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीत सभा जरी गाजवल्या असल्या तरी आमदारकीसाठी ते कधी मैदानात नव्हते.त्यामुळे 2019 च्या या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंचे निवडणुकीत उभे राहणे आणि जिंकणे शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी तेवढंच महत्वाचं आहे. शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष वरळी विधानसभा मतदार संघाची निवड केली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर उमेदवाराला जनतेचे अनेक प्रश्न असतात.आदित्य ठाकरेंना पण जनतेचे अनेक प्रश्न आहेत.‘आपलं महानगर’ने याच प्रश्नांची उत्तरे थेट आदित्य ठाकरेंकडून घेतली.

‘केम छो’सह इतर भाषेत आपण मतदारांना हाक मारली?

- Advertisement -

आदित्य ठाकरे-देशाच्या भाषेत बोलण्यात काय गैर आहे काय? जे माझे पत्र गेले घरोघरी गेले आहे, त्यात मी स्पॅनिश भाषाही वापरली. कारण तुम्हाला आठवत असेल की मी पहिले भाषण दिले होते त्यात मी सांगितले होते की, देशातून, जगभरात माणसे वरळीत येत असतात आणि माझ्या पत्रकात तेच आहे. यासगळ्या भाषेतून मी पत्रकात सुरुवात केली आहे. हे तुम्ही ऐकून घ्या, कारण पुढील पाच वर्षांत हेच तुम्हाला ऐकू येणार आहे गल्लीमधून. देशभरातून लोक वरळी कशी आहे हे बघायला येतील. शिवसेना जेव्हा काम करते, तेव्हा कुणाचा जातधर्म न पाहता आणि आम्ही सर्वांसाठी आहोत. एकत्र येवून काम करू.

प्रश्न- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारात वाढ करावी,असे का वाटते?

- Advertisement -

आदित्य ठाकरे- आज सगळेच पक्ष व स्थानिक स्वराज्य संस्था या अडचणींना तोंड देत असतात. कारण मोठे निर्णय घ्यायचे असतात. पण ते निर्णय घ्यायला, वेगळ्यावेगळ्या पातळींवरुन जावे लागते. कधी सरकारमध्ये विधेयक आणावे लागते. यासर्व गोष्टी चालू असतात. जसे आपण पाहू शकतो की,जागतिक पातळीवरील जी मोठी शहरे आहेत. त्यांना जास्त अधिकार दिले आहेत. न्यूयॉर्क असेल, लंडन असेल. त्या शहरांना, त्यांच्या महापौरांसह लोकप्रतिनिधींना जास्त अधिकार दिले आहेत. मंत्र्यांसारखे अधिकारी दिलेत. मला वाटते जर आपल्याला सगळीच शहरे, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल,संभाजीनगर, जळगाव असेल,अशा स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार द्यावे लागतील. सनदी अधिकार्‍यांना आणि लोकप्रतिनिधी, दोघांनाही कामे करायची असतात. सनदी अधिकारी हे वेगळा अभ्यास घेवून येतात, तर निवडून येणारी लोक ही अनुभव घेवून येतात. या दोघांना कुठेतरी सामाईक व्यासपीठावर आणत निर्णय घ्यायला हवा. लोकल सेल्फ गर्व्हमेंट म्हणता, पण किती सेल्फ गर्व्हमेंट आहे, याचाही विचार करायला हवा.

निवडणूक लढण्याचा विचार कधी केला?

माझा पहिल्यापासून निवडणूक लढवण्याचा विचार नव्हता. निवडणुकीचे वातावरण वेगळेच असते. महत्वाचे म्हणजे ९ वर्षाचा माझा अनुभव आहे की, मी जेव्हा विधानभवन जातो, तेव्हा हे मी हे पाहिले की निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात, त्यांना काम करण्याची चांगली संधी असते. विधीमंडळात बोलून महाराष्ट्ात आपला प्रभाव पाडू शकतो. शिवसेना असा एकच पक्ष आहे जो प्रादेशिक पक्ष असला तरी राष्ट्ीय स्तरावरील मुद्दयाबाबत आवाज उठवत असतो. जर माझ्या निवडणूक लढवण्याबाबत विचाराल तर मागील निवडणुकीत लढायचा विचार होता.

वरळीचाच मतदार संघ का निवडला?
वरळी का तर, तिथे खूप काही विषय आहेत. वरळीत आमचा जो पारंपरिक मतदार आहे, त्यांच्यासाठी आम्ही काम केलेले आहे. महाराष्ट्ातील सर्व जाती धर्माचे लोक तिथे राहत आहेत. जवळपास सर्वच समस्या तिथे आहेत. वरळी कोळीवाडा आहे. तिथे पर्यटन वाढू शकतेे. त्यापुढे जावून पहाल तर बिडीडी चाळी आहे. उंच इमारती आहेत. झोपडपट्टी आहे. विकासाची चांगली संधी आहे. मी सहज जिंकणार असे मी सांगत नाही. परंतु विजयी झाल्यानंतर, काम करण्यात बर्‍याच अडचणी आहेत. जी आव्हाने आहेत, तो अनुभव मला महत्वाचा ठरणार आहे. पुनर्विकासाचे प्रकल्प १८ वर्षांपासून प्रलंबित आहे,असे काही विषय आहे. या सर्वांना घेवून पुढे जायचे आहे. फक्त स्थानिक रहिवाशीच नाही तर दर दिवशी हजारो नोकरदार तिथे येत असतात. जर मला महाराष्ट्ाला दाखवायचे असेल की हा माझा मतदार संघ आहे.

शहरी नेतृत्वाचीच आपल्यावर छाप आहे?

आदित्य ठाकरे- ग्रामीण भागातून निवडणूक लढावी याबाबत चर्चा झाली होती. वरळी का तर साधारण रोज मी जे काही काम करतो ते माझ्या डोळयासमोर असायला पाहिजे. याचा अर्थ हा नाही की माझे सगळीकडे लक्ष राहणार नाही. जर तुम्ही माझे पाच वर्षातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट् असेल, कोकण, विदर्भ असेल,दुष्काळी दौरे पाहिले असतील. पूरग्रस्त भागातील दौरे असतील.इतरही भूमिपुजन,उद्घाटन असतील किंवा अजुनही म्हणजे जनाशिर्वाद यात्रा बघितली असेल. सगळेच दौरे मी ग्रामीण भागातच केले आहेत.

रिमोट म्हणून काम करायला आवडेल की नेता?

आदित्य ठाकरे-रिमोट उध्दव साहेबांकडे आहे. तर टीव्हीपण समोर असायला हवा ना कुठचा तरी

भविष्यात तेजस राजकारणात येईल का?

आदित्य ठाकरे -आता सध्या तो उध्दवजींसोबत फिरत आहे. तो तर वाईल्डलाईफमध्ये आहे. त्यामुळे हे वाईल्डलाईफ आहे की पॉलिटिक्स आहे हे जाणून घेत आहे.

निवडून आल्यावर महत्वाच्या पदावर की आमदार ?

आदित्य ठाकरे-ही जी काही पदे आपण गृहीत धरता, तसे काही माझ्या मनात नाही. जनता जे सांगेल तेच मी करणार आहे. मी आजवर अनेक नेत्यांना, राजकीय पक्षांना पाहिले की ते एका पदासाठी आयुष्य घालवतात. परंतु त्यासाठी जी पूर्ण प्रक्रीया असते, त्याचा आनंद लुटत नाहीत. त्यामुळे पहिले लढू द्या, त्यानंतर जनता जी जबाबदारी सोपवेल त्याप्रमाणे काम करेन.

आपल्यावर बाळासाहेब, उध्दवसाहेब आणि राज ठाकरे यापैंकी कुणाचा प्रभाव आहे?
आदित्य ठाकरे-मला वाटते की जास्तीत जास्त प्रभाव हा शिवसैनिकांचा पडतो. कारण तेच दिवसरात्र आमच्यासाठी एका हाकेवर काम करतात,मेहनत करतात. तहानभूक विसरुन काम करतात. त्यामुळे जास्तीत जास्त प्रभाव हा त्यांचा असतो. आता तुम्ही शिवसैनिकांना विचारायला हवे की त्यांच्यावर प्रभाव कुणाचा आहे तो! सगळेच आम्ही एकच विचारधारा घेवून पुढे चाललोय. शिवसैनिकांकडून शिकण्यासारखे मला खूप आहे. मला आजोबांसह उध्दवजींनी सांगितले की आपण स्वत: शून्य आहोत.शिवसैनिकांमुळे आम्ही आहोत हे माझ्यावर त्यांनी बिंबवले आहे.

शिवसैनिकांकडून कोणता गुण घेतला?
आदित्य ठाकरे-जेव्हा कुणी जर आपल्याकडे मदतीसाठी आला, की ते हे बघत नाही की तो कुठल्या पक्षाचा मतदार आहे. कुठल्या धर्माचा आहे. शिवाय,हे करत असताना तो कुठलेही पद अपेक्षित धरत नाहीत. तसे त्यांच्या मनात कुठलेही पद मनातही नसते. शिवसेना ,देश आणि महाराष्ट्र हेच त्यांच्या डोळ्यांसमोर असते.

मंत्री म्हणून काम करण्यास सांगितले तर?

आदित्य ठाकरे-यामध्ये दोन गोष्टी आहे. एक अर्थात पक्ष जो निर्णय घेईल, लोक जो निर्णय घेईल तो असेल. तर दुसरे म्हणजे स्वत:च्या फ्रि व्हीलला खूप महत्व देतो. त्यामुळे जे काही असेल ते स्वीकारेन, पण मागे वळवणार नाही. यशस्वीपणे पुढे नेईन हे निश्चित.

भाजप प्रादेशिक पक्ष संपवतो,असे आपण म्हणााला होता, त्या मतावर आजही ठाम आहात का?

आदित्य ठाकरे- मला वाटते आता जे काही आम्ही एकत्र आलोय, त्यात राजकीय हेतू कमी आणि राष्ट्र हेतू जास्त आहे. आमचे संघर्ष झाले असतील, पण युती करताना ३७० कलम,अयोध्या मंदिर, ज्याची केस न्यायालयात जोरात सुरू आहे. शिवसेनेने तो विषय पुन्हा एकदा घेतला होता. शेतकर्‍यांचा जो विषय तो सत्तेवर राहून,अन्यायाविरोधात बोलून घेतला. त्यामुळेच १० लाख शेतकर्‍यांना ९६० कोटी रुपये त्यांच्या हक्काचे देवू शकलो. कर्जमुक्ती झाली ती आपण करून घेतली. आता सरसकट कर्जमुक्ती पाहिजे. यासर्व गोष्टी आम्ही केल्या.

राज्याचे नेतृत्व करायला आवडेल की देशाचे?

आदित्य ठाकरे- आता मी या निवडणुकीपुरते बोलेन. प्रत्येकाला देशासाठी काहीतर चांगले करायचे असते. जे घरात संस्कार झाले असतात. देश,महाराष्ट्र, मुंबई आणि आपली गल्ली हे सर्व असतेच. तालुका, आपला गाव आणि देशासाठी जे काही असते त्यात महाराष्ट्रही असतो.

सरकार असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यात एवढा विलंब का?

आदित्य ठाकरे-मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांना पत्र देवून विनंती केलेली आहे. दोनदा संसदेत चर्चाही झाली आहे. विधीमंडळात ठराव संमत करून पाठवला आहे. आता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा. भाजपचे सरकार केंद्रातही आणि राज्यातही आहे. त्यांनी मागणी केली आहे दिल्लीकडे. आता ती लवकरच होईल अशी आमची अपेक्षा आहे.

मुंबई महापालिकेच्या मराठी शाळा बंद का होत आहेत?
आदित्य ठाकरे-महापालिकेच्या १२३२ शाळा आहेत. मराठीसह अन्य भाषिक शाळा आहेत. दुरुस्तीसाठी काही शाळा बंद असल्याने तसे दिसून येत असेल. तर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्याच्या गळतीमागे स्थलांतरण हेही कारण आहे. हा पण एक आहे की, बहुतांशी मुले ही सेमी इंग्लिश शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यामुळे मातृभाषेबरोबरच सेमी इंग्लिशमध्येही शिकत आहेत.

शिवसेना देशाच्या सत्तेत महत्वाचा पक्ष का नाही?
आदित्य ठाकरे-आम्ही प्रत्येक गोष्ट सत्तेसाठी करत नाही. कारण आम्ही ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे घोषवाक्य आहे. हे जे आमचे घोषवाक्य आहे. आपण युपी,बिहार, गुजरात तिथेही आमच्या पक्षाची कार्य चालू असतात. केरळात पूर आला होता, तेव्हा पक्षाच्यावतीने तिथे डॉक्टरांचे पथक पाठवण्यात आले होते. त्यामुळे अशाप्रकारच्या गोष्टी सुरुच असतात, नेपाळमध्येही शिवसेना आहे.

आरेचा उल्लेख जाहिरनाम्यात कुठेच दिसत नाही, आरेचा मुद्दा शिवसेनेने गुंडाळला का?
आदित्य ठाकरे-आरे हा मुुंबईचा विषय आहे. जो राजकारणाचा विषय नाही. अजुन जर आपण पाहिले असेल की जी कामे होतात आहेत. ती वचननाम्यात नाहीत. वचने जी अशी जी पूर्ण केली जाणारी असावी. जी आम्हाला पूर्ण करून सुरु करायची आहेत. पण आरेबाबत आमची भूमिका ठाम आहे.

शिवसेनेच्या भूमिकेला डावलून आरेतील झाडे भाजपने कशी कापली?
आदित्य ठाकरे- तुम्हीच सांगा ही झाडे भाजपने तोडली की मुंबई मेट्ो रेल्वे कार्पोरेशनने. मुख्य मुद्दा हा आहे की शिवसेना विरुध्द भाजप असा हा मुद्दा नाही. ना आदित्य विरुध्द मुख्यमंत्री आहे. इथे शहर विरुध्द विध्वंस हा मुद्दा आहे. जी तज्ज्ञ मंडळी आहेत, ती तर काही राजकीय नाहीत. आरेतील कारशेडच्या बांधकामाबाबत ‘निरी’नेही पक्षचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे निरीचेही ते ऐकत नसतील तर ‘निरी’ही बंद करून टाका. मुख्यत: मुद्दा हा आहे की मुंबई मेट्ो कार्पोरेशन कोर्टात ही केस जिंकली. त्यांची जी काही भूमिका होती, त्यांचा विजय झाला. मुंबईकर हरले. एवढे सगळे जे झाले. कोर्टात जिंकल्यानंतर तुमची बाजू एवढी चांगली असताना, मजबूत असताना चोरासारखे जावून रात्रीच्या अंधारात का झाडे कापलीत? जे अभिमानाने करायचे होते.ते रात्री का केले? एवढे पोलिस का लागले? बरे एवढे पोलिस जे आपण निवडणुकीत वापरतो.

ज्यांवरच आधीच कामाचा ताण आहे. तीच वेळ का मिळाली तुम्हाला, की रात्री चोरीछुपे काम करण्याची. पोलिस पाठवण्याची आणि त्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई मेट्ो कॉर्पोरेशनने दिले आहेत का हे आपल्या माध्यमातून विचारु इच्छितो. झाडे वाचवा, झाडे जगवा,असे होर्डींगद्वारे संदेश द्यायचे आणि झाडे वाचण्यासाठी आंदोलन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करायचे. त्या मुलांनी कोणती दगडफेक, धक्काबुक्की तर केली नव्हती ना. एका बाजुला आदिवासींना बाहेर काढता आणि दुसर्‍या बाजुला कमर्शियल मॉल्स व सर्व न्यायचे आहेत आणि वर सांगता अतिक्रमण, याला काय म्हणायचे. पण त्यादिवशी शिवसेनेने आंदोलन करणे नैतिकद्ष्टया बरोबर नव्हते, म्हणून आम्ही आंदोलन केले नाही. मुंबई मेट्ो कॉर्पोरेशनचे अधिकारी सरकारची दिशाभूल करत आहेत.

( मुलाखत: सचिन धानजी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -