घरमहाराष्ट्रकोश्यारींची राज्यपाल पदावरून त्वरित उचलबांगडी करा; भाई जगताप यांची मागणी

कोश्यारींची राज्यपाल पदावरून त्वरित उचलबांगडी करा; भाई जगताप यांची मागणी

Subscribe

त्याचबरोबर काँग्रेस पक्ष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा असा अपमान कधीच सहन करणार नाही. मी राज्यपालांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. राज्यपालांनी खुलासा देऊन चालणार नाही त्यांनी ताबडतोब महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी असंही भाई जगताप म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(bhagat singh koshyari) यांनी आज मुंबई(mumbai) संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. अर्थात राज्यपालांनी एखाद वादग्रस्त विधान आणि तेही महाराष्ट्राबद्दल करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या आधीही राज्यपालांनी अशी वादग्रस्त विधान केली होती. दरम्यान राज्यपालांच्या आजच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीकात्मक प्रतिक्रिया येत होत्या. त्याच प्रमाणे सामान्य जनतेमधूनही संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. सरम्यान या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे आमदार भाई जगताप(congress mla bhai jagtap) यांनी सुद्धा राज्यपालांची पदावरून उचल बांगडी करावी आणि ती ही त्वरित अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा असा अपमान कधीच सहन करणार नाही. मी राज्यपालांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. राज्यपालांनी खुलासा देऊन चालणार नाही त्यांनी ताबडतोब महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी असंही भाई जगताप म्हणाले.

हे ही वाचा – मला तोंड उघडायला लावू नका अन्यथा भूकंप होईल : एकनाथ शिंदेंचा टोला

- Advertisement -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(bhagat singh koshyari) यांनी मुंबईतून गुजराती व राजस्थानी गेले तर मुंबईत पैसे उरणार नाहीत व मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य कार्यक्रमादरम्यान केले. त्यांच्या या वक्तव्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. सर्व क्षेत्रातून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील या संतापजनक वक्तव्याचा निषेध केला व त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मुंबई व महाराष्ट्राबद्दल संतापजनक वक्तव्य करून राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीचा, फुले-शाहू-आंबेडकरांच्या संस्कृतीचा आणि मुंबईत व महाराष्ट्रात(mumbai – maharahstra) राहणाऱ्या मराठी माणसाचा अपमान केलेला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. मुंबई व अखंड महाराष्ट्रासाठी मराठी माणसाने जे योगदान दिले हे त्यांनी विसरता कामा नये.

- Advertisement -

हे ही वाचा – राज्यपालांना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलीय, उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये मराठी माणसाचे योगदान फार मोठे मोलाचे आहे परंतु काहीही अभ्यास न करता त्यांनी अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य करून त्यांनी मुंबई व महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा व महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाचा अपमान केलेला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही, मराठी माणसाचा द्वेष करणारे व महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, हे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून त्वरित उचलबांगडी करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे.

हे ही वाचा –  महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा, नाना पटोलेंची मागणी

भाई जगताप(bhai jagtap) पुढे म्हणाले की, या आधी भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल देखील अपमानजनक वक्तव्य करून त्यांचा अपमान केला होता. आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन भूमीचा आणि येथील मराठी माणसाचा अपमान केला आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागायलाच हवी. मुंबईत सर्व एकोप्याने राहत असताना अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(bhagat singh koshyari) मुंबईत व महाराष्ट्रात गुजराती व राजस्थानी विरुद्ध मराठी असा प्रांतवाद निर्माण करू पाहत आहेत. त्यांचे हे वक्तव्य जाणूनबुजून निवडणुकांच्या तोंडावर केले गेलेले आहे. त्यामुळेच भाजप नेते यावर काहीच बोलायला तयार नाहीत. सगळे मुक गिळून गप्प बसलेले आहेत. काँग्रेस पक्ष मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा असा अपमान कधीच सहन करणार नाही. मी राज्यपालांच्या या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. राज्यपालांनी खुलासा देऊन चालणार नाही त्यांनी ताबडतोब महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी.

हे ही वाचा – राज्यातील नागरिकांमध्ये फूट पाडू नका, पेडणेकरांचा राज्यपालांना सल्लावजा इशारा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -