घरताज्या घडामोडीएखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, संभाजीराजेंची मागणी

एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, संभाजीराजेंची मागणी

Subscribe

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे. शिवाय महाराष्ट्राची परंपरा जाणणारा आणि त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत असे, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे.

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, असं संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आणि विकासामध्ये मराठी माणसाचे योगदान फार मोठे आणि मोलाचे आहे. परंतु काहीही अभ्यास न करता त्यांनी अशा प्रकारचे संतापजनक वक्तव्य करून त्यांनी मुंबई व महाराष्ट्रासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा व महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसाचा अपमान केलेला आहे. मुंबई, महाराष्ट्रातील मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही, मराठी माणसाचा द्वेष करणारे व महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, हे त्यांच्या वक्तव्यावरून सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्यांची राज्यपाल पदावरून त्वरित उचलबांगडी करण्यात यावी, अशी आमची मागणी असं काँग्रेसचे आमदार भाई जगताप म्हणाले.


हेही वाचा : डीएनए चाचणी निगेटिव्ह येणे हा बलात्कार न झाल्याचा ठोस पुरावा ठरू शकत नाही – हायकोर्ट


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -