घरमहाराष्ट्रGanesh Visarjan 2020 Live : नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण नदी पात्रात...

Ganesh Visarjan 2020 Live : नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण नदी पात्रात बुडाले

Subscribe

नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण नदी पात्रात बुडाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू आहे.  दारणा नदी पात्रात बुडून नरेश कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर वालदेवी नदीत बुडालेल्या अजिंक्य गायधणीचा अद्याप शोध सुरू आहे.


आतापर्यंत ९२ सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. तर घरगुती १८१३ गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. यामध्ये ४० सार्वजनिक मंडळांच्या तर ७८४ घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले.

- Advertisement -

मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर सार्वजनिक गणपतींचे विसर्जन सुरू

- Advertisement -

पुण्याचा मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे विसर्जन, आकर्षक फुलाने सजवलेली ‘श्रीं’ची पालखी, गणेश मंडळाने गणपती समोरील मयूर कुंडात लाडक्या बाप्पाचा विसर्जन करण्यात आले.


पुण्यातील तिसऱ्या मानाचा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन संपन्न. विसर्जनासाठी फक्त ७ कार्यकर्त्याना उपस्थित राहण्याची परवानगी.


पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीचे जवळच असलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.

पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन

पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जनाची जय्यत तयारी

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Tuesday, September 1, 2020


पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे गणेस विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाले असून त्यांनी बाप्पाच्या पालखीला खांद्यावर घेतले. यावेळी शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र शिवसे हेदेखील उपस्थित होते.


पुण्यातील दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. थोड्यात वेळात बाप्पाचे विसर्जन होईल.


पहिल्या मानाच्या पाठोपाठ इतर ४ मानाच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. यंदा सर्व गणपतींचे उत्सव मंडपातच विसर्जन केले जाणार आहे.


पुण्यात सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाली असून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत ८५ टक्के लोकांनी आपल्या बाप्पांना संसर्गाचा धोका वाढणार नाही याची खबरदारी घेत निरोप दिला. पुणेकरांचा पहिला मानाचा गणपती कसबा गणपतीच्या विसर्जनाला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. परंपरेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ कसबा गणपतीला हार घालून आरती करण्यात आली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास पहिला मानाच गणपती असलेल्या कबसा गणपतीचे विसर्जन करण्यात आले.


मुंबईमध्ये दरवर्षी गणपती मिरवणुकीची वेगळीच धूम असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकीवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईमध्ये अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने विशेष काळजी घेण्यात आली असून शहरात ३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुकीला बंदी असून दुपारी १२ ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत ५४ रस्ते अन्य वाहतुकीसाठी बंद घालण्यात आली आहे. तसेच ९९ जागांवर पार्किंगला बंदी असून ५६ रस्त्यांवर फक्त एकेरी वाहतूक सुरू राहणार आहे. दरम्यान, शहरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. तसेच मुंबई महापालिकेने गर्दीचे विभाजन करण्यासाठी ४४५ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. तसेच २३ हजार कर्मचारी, म्हणजेच दरवर्षीपेक्षा तिप्पट मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. यंदाच्या विसर्जनासाठी पालिकेने तिप्पट ते चौपट यंत्रणा तैनात ठेवली आहे.


अनंत चतुर्दशीला अकरा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन होते. आज, मंगळवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोबिंवली, पुणे, नागपूर, नाशिक यांच्यासह राज्यातील जिल्ह्याजिल्ह्यात गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जात आहे. मात्र कोरोना संकटाच्या काळात सर्वच सण, उत्सव साधेपणाने साजरा होत असताना गणेश विसर्जनदेखील साध्या पद्धतीने केले जाणार आहे. यंदा राज्य सरकारने आखून दिलेल्या नियम-अटींनुसार गणरायाची कमी उंचीची मूर्ती सर्व सार्वजनिक मंडळांमध्ये ठेवण्यात आली आहे. तसेच भाविकांनी त्यांच्या जवळील कृत्रिम तलावात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहनही सरकारने केले आहे. शिवाय, पालिका, स्थानिक प्रतिनिधींच्या वतीनेही गणरायांना एकत्र घेऊन सामुहिक विसर्जन केले जाणार आहे. त्यामुळे दरवर्षी होणारा उत्सव, मिरवणूक, ढोलताशांचा आवाज यंदा बाप्पाला निरोप देताना नसणार आहे. राज्यात ठिकठिकाणी फिरत्या हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे.

हेही वाचा –

न ढोलताशे, न मिरवणूक… साधेपणाने होणार ‘बाप्पा’चे विसर्जन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -