घरCORONA UPDATEगडचिरोलीत कोरोनाचे नवीन १६ रूग्ण, एकूण संख्या २९२वर!

गडचिरोलीत कोरोनाचे नवीन १६ रूग्ण, एकूण संख्या २९२वर!

Subscribe

गडचिरोली जिल्हयात आज १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. गडचिरोली येथील ३, चामोर्शी येथील ५, आरमोरी येथील ३, सिरोंचा येथील १ आणि अहेरी येथील १ असे एकूण १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तर १६ नवीन कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली येथील ६ जणांचा समावेश असून १ गुलमोहर कॉलोनी येथील रहिवासी, १ नवेगाव येथील, १ कलेक्टर कॉलोनी  आणि ३ जण सामान्य रुग्णालयातील आहेत. तर चामोर्शी येथील ८ जण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. यामध्ये ४ चामोर्शी पोलीस ठाण्यातील, 3 जण कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत.१ जण रेखेगांव आष्टी येथील आहे. अहेरी येथील मंचेरीयाल येथून आलेला १, वडसा येथील १ सीआरपीएफ जवान, २ जण कुरखेडा येथील असून ते रामगड येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती झाले होते.

- Advertisement -

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या २९२ झाली असून एकुण बाधित संख्या ११७९ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ८८६  रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


हे ही वाचा – धक्कादायक! आत्महत्येच्या २ दिवस आधी रिया होती सुशांतच्या घरी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -