घरमहाराष्ट्रIncome Tax : राजन विचारेंनी प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्याचे वृत्त फेटाळले

Income Tax : राजन विचारेंनी प्राप्तिकर विभागाची कारवाई झाल्याचे वृत्त फेटाळले

Subscribe

जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीने आज सकाळी रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरासह सात ठिकाणी छापेमारी केली होती.

ठाणे : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली. यानंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केल्याची माहिती समोर आली. यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांवर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा उद्या (10 जानेवारी) निकाल येण्याआधीच कारवाई होत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. पण, काही वेळानंतर राजन विचारेच्या घरावर प्राप्तिकर विभागाची छापा पडल्याचे वृत्त फेटाळून लावले. यामुळे संपूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून राजन विचारे सलग दोन वेळा ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. याआधी राजन विचार हे आमदार आणि नगरसेवकही राहिले आहे. शिवसेने फूट पडल्यानंतर राजन विचार हे ठाकरे गटासोबत राहिले.

- Advertisement -

जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीने आज सकाळी रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरासह सात ठिकाणी छापेमारी केली होती. ईडीच्या पथकात 10 ते 12 अधिकाऱ्यांचा यात समावेश होता. ईडीच्या पथकाने वायकरांच्या घराची झाडाझडती केली होती.

हेही वाचा – माजी मुख्यमंत्र्यांना अध्यक्षांच्या कामाची माहिती असावी; ठाकरेंच्या ‘त्या’ आरोपावर Rahul Narwekar संतापले

- Advertisement -

ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर झाली कारवाई

यापूर्वी केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात ठाकरे गटाचे अनेक नेते सापडले आहे. यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, ठाकरे गटाचे आमदार आणि मंत्री अनिल परब या नेत्यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्या आहेत. यात संजय राऊत यांना ईडीने अटक केले होते आणि यनंतर संजय राऊतांना तीन महिन्याचा तुरुंगास देखील झाला होता.

हेही वाचा – Internal Disputes In MNS : मनसेचा अंतर्गंत वाद चव्हाट्यावर; नवी मुंबईत दोन गटांत राडा

वायकरांवर ‘या’ प्रकरणी ईडीकडून कारवाई

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे 2021मध्ये रवींद्र वायकर यांना जोगेश्वरीच्या व्यारवली गावात 2 लाख स्क्वेअर फुटाचे पंचतारांकित हॉटेलचे बांधकाम करण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून देण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही जागा खेळाचे मैदान म्हणून आरक्षित होती. परंतु या ठिकाणी वायकर यांनी 500 कोटी रुपये किमतीचे हॉटेल उभारले, असा गंभीर आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वीच केला आहे. याप्रकरणी 11 मार्च 2023 रोजी किरीट सोमय्या यांनी तक्रार दिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -