घरCORONA UPDATECoronaVirus : सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या देशात भारताचाही समावेश!

CoronaVirus : सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या देशात भारताचाही समावेश!

Subscribe

अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, यांसारख्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ६४० लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये भारतात २० हजाराहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, यांसारख्या १७ देशांमध्ये भारताचा समावेश आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ६४० लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात २५१ जणांचा बळी गेला आहे. तर गुजरातमध्ये ९० लोक, मध्यप्रदेशात ७६, दिल्लीमध्ये ४७, राजस्थानात २५, तेलंगणामध्ये २३ आणि आंध्रप्रदेशामध्ये २२ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच कोरोनामुळे उत्तरप्रदेशमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोना बधितांचा ५२१८ हा मोठा आकडा महाराष्ट्रात आहे. तर गुजरात- २१७८, दिल्ली- २१५६, राजस्थान- १६५९, तामिळनाडू- १५९६ आणि मध्यप्रदेश १५५२ अशी संख्या समोर आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टरांच्या चमुशी तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींची चर्चा केली. आणि कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान असून या सर्वांचे कौतुक केले. तसेच शाह यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत लक्ष देण्याचे आश्वासन दिले. गृहमंत्री यांची चर्चा अशा वेळी झाली की, देशात कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले होते. त्यावेळी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात होते. अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -