घरमहाराष्ट्रआमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल; केसीआर यांच्या 'या' वक्तव्यावर राऊतांचा टोला

आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल; केसीआर यांच्या ‘या’ वक्तव्यावर राऊतांचा टोला

Subscribe

मुंबई : तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?, असा प्रश्न केसीआर (KCR) यांनी पंढरपुरमधील जाहीर सभेत केला. या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांकडून केसीआर यांच्यावर टीका होत असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निशाणा साधला आहे. (Intervention in our state would be sanjay Rauts attack on KCR statement of farmers in Maharashtra)

हेही वाचा – आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल; केसीआर यांच्या ‘या’ वक्तव्यावर राऊतांचा टोला

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, केसीआर यांनी तेलंगणा राज्यातल्या शेतकऱ्यांचं हित जरूर पाहावं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हित पाहण्यासाठी इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येण्याची गरज नाही. हा आमच्या राज्यातील हस्तक्षेप ठरेल. त्यांचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही. त्यांच्या पक्षाकडे राजकीय धोरण नाही. त्यांचा पक्ष फक्त तेलंगणामध्ये आहे, बाजूच्या आंध्रप्रदेशमध्येही नाही, पण तरीही ते महाराष्ट्रात घुसत आहेत, याचं कारण भारतीय जनता पक्षाने त्यांना सुपारी दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्रास द्यायचा, मतविभागणी करायची आणि त्यासाठी केसीआर यांचं प्रयोजन भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेलं आहे. 2019 त्याआधी आणि नंतर एमआयएमला याचपद्धतीने आणलं होतं. भारतीय जनता पक्षाचा बी टीम तयार करण्याचं एक स्वतंत्र कक्ष आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी भाजपावर केला.

हेही वाचा – BRS बद्दल विरोधकांची भूमिका काय? खर्गेंनी दिली माहिती

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, भाजपा कधी ते मनसेला वापरतात, कधी एमआयएमला, कधी केसीआरला बोलावतात, तर कधी आणखी एखाद्या कोणालातरी आघाडीला बोलावतात. हे त्याचं धोरण आहे, पण त्यांनी या वेळेला 2024 साली कितीही प्रयोग केले तरीही महाविकास आघाडी मजबूतीने सगळ्यांशी लढा देईन. मुळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काळजी वाहण्याचं काम केसीआर यांनी करू नये. त्याचं ते काम नाही. त्यांनी आपल्या राज्यात पाहावं. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. त्यांच्या राज्यामध्ये आतापर्यंत 65 सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत. कारण ग्रामपंचायतीची काम केल्याची बिल मिळत नाहीत. असे अनेक प्रकरण आहेत. त्यांच्या राज्यामध्ये भ्रष्टाचाराची सगळ्यात मोठी प्रकरणे आहेत. त्यांच्या मुलीवर भ्र्ष्टाचाराचे आरोप आहेत आणि ईडी त्यांची चौकशी करते आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून ते महाराष्ट्राला भारतीय जनता पक्षाला मदत करायला घुसले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -