घरक्राइमअपहारातील पैशांतून गटसचिवांची गुंतवणूक, कोरडेंनी घेतले अनेक भूखंड

अपहारातील पैशांतून गटसचिवांची गुंतवणूक, कोरडेंनी घेतले अनेक भूखंड

Subscribe

नाशिक : वणी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत गटसचिव दत्तात्रय कोरडे यांनी केलेल्या अपहाराची व्याप्ती वाढली असून, जिल्हा बँकेतील अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीमुळे कोरडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, 2019 मध्ये वणी सोसायटीत झालेल्या गैरव्यवहाराचा ठपका कोरडे यांच्यावर ठेवण्यात आला होता. तरीही कोरडे यांच्यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे त्यांचे धाडस वाढल्याचे बोलले जाते आहे. विशेष म्हणजे अपहारातील पैशांमधून वणीसह लगतच्या काही गावांमध्ये अनेक भूखंड घेतल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वणी विविध कार्यकारी सोसायटीत गटसचिव दत्तात्रय कोरडे आणि निरिक्षक तथा वसूली अधिकारी किशोर गांगुर्डे यांनी तब्बल १ कोटी रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली होती. याप्रकरणी जिल्हा बँकेतील अधिकार्‍यांनी चौकशी केली असता या प्रकरणातील व्याप्ती वाढल्याची माहिती सूत्रांकडून समजली. दरम्यान, २२ जानेवारी 2019 रोजी वणी विविध कार्यकारी सोसायटीत अनियमित कर्जवाटप आणि व्याज आकारणी यातील गैरव्यवहाराबाबत जिल्हा बँकेने तपासणी केली असता बहुतांश प्रकरणात गटसचिव दत्तात्रय कोरडे यांच्यावर चौकशी समितीने ठपका ठेवला होता.

- Advertisement -

दरम्यान, 5 वर्षांनी पुन्हा कोरडे यांचे नाव चर्चेत आले असून आताचा अपहार १ कोटींवर असल्याने कोरडेंवर कुणाचा वरदहस्त आहे याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. अपहार केलेल्या पैशांतून कोरडेंनी वणी व परिसरातील गावांत स्वत:सह नातलगांच्या नावाने जमीन घेतल्या असून अपहारप्रकरणी जिल्हा बँकेच्या अधिकार्‍यांकडून कसून चौकशी सुरु असल्याने कोरडे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

याप्रकरणी चौकशी सुरु असून लेखापरिक्षण अहवाल येईपर्यंत त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देता येणार नाही. : दत्तात्रय कोरडे, गटसचिव, वणी वि. का. सोसायटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -