घरमहाराष्ट्रIqbal Singh Chahal : चहल थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अप्पर मुख्य सचिवपदी झाली...

Iqbal Singh Chahal : चहल थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी, अप्पर मुख्य सचिवपदी झाली नियुक्ती

Subscribe

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपलेला होता. मात्र तरीही त्यांची बदली करण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शिंदे सरकारला पत्र पाठवत चहल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याची आठवण करून दिली होती. त्यानंतर अखेर 18 मार्च रोजी  इकबाल सिंह चहल यांना पदावरून हटविण्यात आले होते. यानंतर आता त्यांची मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. (Iqbal Singh Chahal has been directly appointed as Chief Ministers Court Upper Chief Secretary)

 हेही वाचा – Bhosari Plot Misappropriation Case : एकनाथ खडसेंना दिलासा; पत्नीसह जावयाला जामीन

- Advertisement -

चहल हे गेले पावणेचार  वर्षाहून अधिक काळ  मुंबई महापालिकेत  आयुक्त म्हणून ठाण मांडून बसले होते. लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत  तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण केलेल्या किंवा मूळ जिल्ह्यात नियुक्ती असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश  निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. मात्र, या निर्देशांकडे सरकारने कानाडोळा केला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर भारत निवडणूक आयोगाने बदलीसाठी पात्र असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रक्रिया सुरु केली होती. त्यानुसार 20 मार्च 2024 रोजी निवडणूक आयोगाने  चहल यांना आयुक्तपदावरून दूर केले होते. त्यानंतर आज चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात वर्णी लावण्यात आली. तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावरून बाजूला करण्यात आलेले पी. वेलरासू यांची नियुक्ती मंत्रालयात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव म्हणून करण्यात आली आहे.

हेही  वाचा – Arvind Kejriwal Arrested : केजरीवालांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; ईडी दाखल करू शकते हेरगिरीचा गुन्हा

- Advertisement -

दरम्यान, शिवेसना उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी चहल यांच्या नियुक्तीवर जोरदार टीका केली आहे.  मी दोन दिवसांपूर्वी भाकीत केले होते, अगदी तसेच घडत आहे. मुंबई महापालिकेचे भ्रष्ट माजी आयुक्त आता मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झाले आहेत.  घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मदत करण्यासाठी  या भ्रष्ट माजी आयुक्तांची विशेष नियुक्ती झाली आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी मदत केल्याबद्दल मिळालेले हे बक्षीस आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -