घरमहाराष्ट्रअदानीपेक्षा बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न महत्त्वाचे; शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर

अदानीपेक्षा बेरोजगारी, महागाईसारखे प्रश्न महत्त्वाचे; शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर

Subscribe

हिंडेनबर्ग ही बाहेरची कंपनी असून त्या कंपनीवर आपण किती लक्ष केंद्रीत करायचे, हे आपण ठरवले पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना घरचा आहेर दिला आहे.

शरद पवार यांनी अदानीच्या मुद्द्यावरून विरोधकांना घरचा आहेर दिला आहे. गौतम अदानी यांच्यापेक्षा देशात बेरोजगारी, महागाई, शेतीचे प्रश्न यांसारखे देखील मुद्दे आहेत. तसेच हिंडेनबर्ग ही बाहेरची कंपनी असून त्या कंपनीवर आपण किती लक्ष केंद्रीत करायचे, हे आपण ठरवले पाहिजे, असे म्हणत शरद पवार यांनी विरोधकांना घरचा आहेर दिला आहे. तर अदानी मुद्द्याच्या संदर्भात शरद पवार यांनी त्यांच्यासोबत असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेत तर्कवितर्क लढवले जात आहे. शरद पवार यांनी आज (ता. ०८ मार्च) पत्रकार परिषद आयोजित केले होती. त्यावेळी ते बोलत होते.

हिंडेनबर्ग ही परदेशातील कंपनी असून या कंपनीबद्दल आपल्याला फारशी माहिती नसल्याचे शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले. यावेळी ते बोलताना म्हणाले की, हिंडेनबर्ग ही कंपनी परदेशातील आहे. ती कंपनी या देशाच्या परिस्थितीशी संबंधीत काही भूमिका घेते. त्याच्यावर आपण किती लक्ष केंद्रीत करायचे, याचा विचार केला पाहिजे. त्यापेक्षा सुप्रिम कोर्टाची कमिटी अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल, असे शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाने चौकशी करणे परिणामकारक
अमेरिकेची संस्था असलेल्या हिंडेनबर्ग या संस्थेने अहवाल देऊन गौतम अदानी यांच्या अडचणींमध्ये वाढ केली आहे. तर अदानी यांनी २० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी जेपीसी स्थापन करण्याची मागणी केली आहे. पण या समितीकडून चौकशी करण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, असा सल्ला शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेला आहे.

“जेपीसीमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची समिती असते. ज्या पक्षाचे सदस्य जास्त असतात, त्यांना या कमिटीमध्ये अधिक जागा मिळतात. त्यामुळे या कमिटीमध्ये विरोधकांचे सदस्य कमी आणि सत्ताधाऱ्यांचे सदस्य अधिक असतील. याप्रकरणाची चौकशी नीट करावी अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने चौकशी करावी, अशी आमची मागणी आहे. जेपीसीला मी विरोध करत नाही, जेपीसीचा मीही अध्यक्ष होतो. जेपीसी बहुमत बळावर समिती असते, त्यामुळे सुप्रीम कोर्ट समिती प्रभावी ठरेल. बाहेरची संघटना सांगेल त्यापेक्षा सुप्रीम कोर्ट सांगेल ते जनता स्वीकारेल,” असे यावेळी शरद पवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – आयआयटीचा विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या आत्महत्येबाबत समोर आली महत्त्वाची माहिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -