घरCORONA UPDATECoronavirus : कोरोना व्हायरसची लस शोधण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो!

Coronavirus : कोरोना व्हायरसची लस शोधण्यास एक वर्षाचा कालावधी लागू शकतो!

Subscribe

भारतीय वैज्ञानिक यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे २०२१ या वर्षांच्या आधी लस शोधणे असंभव आहे.

कोरोना व्हायरसवर लस शोधण्याच्या शर्यतीत भारतीय सहा कंपन्यांचा समावेश आहे. परंतु, भारतीय वैज्ञानिक यांच्या म्हणण्यानुसार, जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे २०२१ या वर्षांच्या आधी लस शोधणे असंभव आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग जागतिक स्तरावर १९ लाख पेक्षा जास्त लोकांना झाला आहे. तसेच १.२६ लाखांहून अधिक लोक मरण पावली आहेत. जगभरातील संशोधक या महामारीवर तोड शोधण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. फरीदाबाद स्थित ट्रान्सलेशन हेल्थ अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटचे कार्यकारी दिग्दर्शक गगनदीप कंग म्हणतात की, कोरोना व्हायरस महामारीला हरविण्यासाठी विस्तार आणि वेगाने जागतिक संशोधन आणि विकासाचे प्रयत्न अत्यंत जुळणारे आहेत. मात्र, सीईपीआई व्हाईस चेअरमन कंग यांनी सांगितले की, कोणत्याही लसीच्या परिक्षणाची प्रक्रिया किचकट आणि आव्हानात्मक असते. सार्स-कोव-२ (कोविड-१९) लस शोधण्यासाठी अन्य आजारांच्या लसीप्रमाणे १० वर्षांचा कालावधी नाही लागणार. परंतु एखादी लस शोधल्यावर तिला सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी कमीत कमी १ वर्षांचा कालावधी हा लागतोच.

केरळमधील राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजीचे चीफ सायंटिफिक ऑफिसर इ. श्रीकुमार आणि हैदराबादचे सीएसआईआर-सेंटर फॉर सेलुलर अँड मॉलीक्यूलर बायलॉजीचे दिग्दर्शक राकेश मिश्रा सांगतात की, कोणतीही लस तयार करण्यासाठी बरेच वर्ष जातात. परिक्षणाचे विविध स्तर पार करण्यासाठी आणि त्यानंतर लसीचा मंजुरी मिळण्यासाठी लागणार अवधी यामुळे यंदा कोरोनाची लस उपलब्ध होणे कठीण आहे.

- Advertisement -

असे होते लसीचे परीक्षण

  • लसीच्या परिक्षणाची सुरुवात ही प्राण्यांपासून केली जाते.
  • लॅब टेस्टिंग दरम्यान प्राण्यांवर विविध प्रकारे परिक्षण केले जाते.
  • मानवी चिकित्सकीय परिक्षण हे काही प्रमाणात मानवावरही सुरू केले जाते.
  • पहिल्या टप्प्यात लस सुरक्षित ठरली तर तिचे १०० लोकांवर परिक्षण केले जाते.
  • दुसऱ्या टप्प्यात आजारावर ही लस किती प्रभावी आहे याचा अभ्यास केला जातो.
  • निर्णायक टप्प्यात काही हजार लोकांवर या लसीचा प्रयोग करून आजाराला रोखण्याची क्षमता किती आहे, हे पाहिले जाते.
  • व्हायरसचे सतत बदलणाऱ्या रुपांवर किती प्रभावी आहे, याचे ही परिक्षण केले जाते.

डब्ल्यूएचओने दिलेल्या माहिती नुसार, साधारण ७० लसीचे प्रि-क्लीनिकल परीक्षण आतापर्यंत झालेले आहे. यात तीन प्रयोगशााळा असून मानवी चिकित्सकीय परीक्षणासाठी परवानगी दिली आहे.

इथे लसीवर संशोधन सुरू

  • ४६ टक्के शोध हे उत्तर अमेरिकामध्ये सुरू आहे.
  • १८-१८ टक्क्यांची भागीदारी चीन आणि युरोपची आहे.
  • १८ टक्के भागीदारी आशिया आणि ऑस्ट्रेलिया यांची आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -