घरCORONA UPDATEडॉक्टर्स, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सलमान खान याने सुनावले खडेबोल

डॉक्टर्स, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सलमान खान याने सुनावले खडेबोल

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर्स, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सलमानने खडेबोल सुनावले आहेत.

बॉलीवूडचा दबंग हिरो सलमान खान सध्या लॉकडाऊनच्या काळात सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचवत आहे. लॉकडाऊनच्या काळात सलमान काय करतोय हे त्याने शेअर केलेल्या व्हिडिओजमधून समजते. मात्र काल रात्री सलमान खानने असा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला, ज्याने या संकटाच्या काळात समाजातील चुकीचे कृत्य करणाऱ्यांचे चांगलेच डोळे उघडले असतील. नेहमी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवणारा, त्यांचे मनोरंजन करणारा सलमान खान यांनी सामाजिक संदेश देत सध्याचे भयाण वास्तव लोकांसमोर मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर्स, पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना सलमानने खडेबोल सुनावले आहेत.

हेही वाचा – तुकाराम मुंढेंचा पॅटर्नच वेगळा, नागपूरमध्ये भिकारी, बेघरांचे ‘स्किल डेव्हलपमेंट’

- Advertisement -

सामाजिक जाणीवेचा कलाकार 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भारतातही कोरोनाचे ११ हजाराहून अधिक रुग्ण झाले आहेत. गेल्या २२ मार्चपासून देशातील सर्व नागरिक आपापल्या घरी क्वारंटाइन आहेत. लॉकडाऊनमुळे कोणालाही बाहेर पडता येत नाही. अशावेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स, वॉडबॉय, पोलीस हे त्यांचे कर्तव्य चोख बजावत आहेत. मात्र याच देवदुतांवर काही ठिकाणी दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर सलमान खान याने नाराजी दर्शवली आहे. जे तुमचे प्राम वाचवत आहेत. त्यांनाच तुम्ही मारतायं. क्वारंटाइनमध्ये असताना हॉस्पिटलमधून पळून जाताय…, यावर सलमानने दुःख व्यक्त केले. नेहमी मजेशीर गोष्टी बोलणाऱ्या, लोकांचे मनोरंजन होईल, असे व्हिडिओ टाकणाऱ्या सलमानने इतक्या गंभीर विषयावर चाहत्यांमध्ये जनजागृती केल्यामुळे त्याच्या या व्हिडिओसाठी सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -