घरमहाराष्ट्रJayant Patil : पुरोगामी महाराष्ट्रात दंगली, महिलांवर अत्याचार; जयंत पाटलांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना...

Jayant Patil : पुरोगामी महाराष्ट्रात दंगली, महिलांवर अत्याचार; जयंत पाटलांचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

Subscribe

 

 

- Advertisement -

मुंबईः महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत असताना राज्यातील पोलीस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे, असा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगतानाच यावर प्रकाश टाकणारे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना पाठविले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था अडचणीत आणून विविध समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार काही शक्ती करीत असताना त्यांच्यावर कारवाई न होणे ही बाब शासनाला निश्चितच भूषणावह नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मुंबई चर्चगेट परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात घडलेली मुलीच्या हत्येची घटना दुर्दैवी आहे. राज्यात महिलांना सुरक्षित वाटले पाहिजे. महिलांवरील अत्याचार व त्यांचे गायब होण्याचे प्रमाण अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या घटनांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करुन सामान्य जनतेचे रक्षण करण्यात हे सरकार कटिबद्ध असल्याचे दाखवून द्यावे अन्यथा फक्त ४० आमदारांच्या रक्षणासाठी हे सरकार कारभार करीत असल्याची सामान्य जनतेच्या मनातील भावनेस खतपाणी मिळेल असेही जयंत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचाःAyodhya Pol : अयोद्ध्या पोळ यांच्यावर हल्ला करणारे डरपोक, हिम्मत असेल तर समोर या; संजय राऊतांचे आव्हान

महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे.पुरोगामी महाराष्ट्रात घडत असलेल्या या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधितांना द्याल, अशी आशा जयंत पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्यावर फसवून हल्ला

पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा येथे त्यांना एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. निमंत्रणानुसार त्या कार्यक्रमाला गेल्या. मला तेथे माझ्या ओळखीचं कोणचं दिसलं नाही. तेथे शंभर दीडशे महिला होत्या. चार मुलं होती. मला थोडा संशय आला. मी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. पण ते मला म्हणाले की आता तुम्ही महापुरुषांच्या कार्यक्रमात आलाय मग तसेच जाणार का? मी म्हटलं नाही आता आले तर करून जाणार, असे पौळ यांनी तेथील उपस्थितांना सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला का हार घातला, असा जाब त्यांनी मला विचारला. तुम्ही अपमान केला, असे म्हणून एका सेकंदांत शाईची पूर्ण बॉटल माझ्या अंगावरती टाकली दुसरीने मला मारलं, मी त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्यांना मला अडवल. जाऊ दिलं नाह. एका बाजूला टेबल लावलेला होता आणि टेबलच्या बाजूला बाईक होती. त्यामुळे मी टेबलवर उडी मारून पण जाऊ शकत नव्हते. या घटेननंतर मी थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दिली. तक्रार देऊन पोलीस ठाण्याच्या बाहेर पडल्यावर पुन्हा मला मारहाण करण्यात आली, असे पौळ यांनी सांगितले.

मी आणि माझा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. माझ्या देशाचे संविधान कोणावरही हात उचलायची परवानगी देत नाही म्हणून होते असलेला हल्ला अहिंसेचा मार्ग अवलंबत सहन करत होते, माझी लढाई ही संविधानिक आहे आणि मी ती लढेल. आज माझा शिवसेना पक्ष, माझे नेते-उपनेते, आमदार आणि लाखो शिवसैनिक माझ्या सोबत आहे.फसवणूक करून मला कार्यक्रमाला बोलावून माझ्यावर शाईफेक करण्यात आली. मारहाण करण्यात आली. कट रचून हे सर्व करण्यात आलं. सोशल मीडियावर मी सतत ठाकरे गटाची बाजू मांडत असते. म्हणूनच मला टार्गेट करण्यात आलं. असा हल्ला झाला म्हणून मी घाबरणार नाही. मी माझे काम करतच राहणार, असे पौळ
यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -