घरमहाराष्ट्रShrikant Shinde : युतीतील वादावर श्रीकांत शिंदे म्हणाले, खालच्या स्तरावर...; कार्यक्रमाला रवींद्र...

Shrikant Shinde : युतीतील वादावर श्रीकांत शिंदे म्हणाले, खालच्या स्तरावर…; कार्यक्रमाला रवींद्र चव्हाण गैरहजर

Subscribe

 

कल्याणः भाजप आणि शिवसेना, आम्ही एकत्र होतो, आणि आहोत, असे स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी दिले. कल्याण लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीकांत शिंदे यांनी युतीत सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले असले तरी या कार्यक्रमाला भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण हे गैरहजर होते. कार्यक्रमाच्या बॅनरवर फोटो असून आमदार रविंद्र चव्हाण गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कविर्तक लढवले जात होते.

- Advertisement -

श्रीकांत शिंदे म्हणाले, आजच्या कार्यक्रमाला भाजप आणि शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार उपस्थित होते. त्यामुळे आमच्या छोट्या मोठ्या गोष्टींनी युतीत खडा पडणार नाही. खालच्या स्तरावर छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. युती इतकी कमकुवत नाही की त्याने युती तुटेल. काही वेळा कार्यकर्त्यांचा भावनिक विषय असतो. पण त्याचा युतीवर परिणाम होत नाही. कारण युतीही वेगळ्या विचारांनी झाली आहे.

मात्र बॅनरवर फोटो असूनही आमदार रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला गैरहजर का होते, असा सवाल माध्यमांनी श्रीकांत शिंदे यांना केला. त्यांना काही तरी वेगळे काम असेल म्हणून ते गैरहजर होते. अन्य भाजप कार्यकर्ते, नगरसेवक व अन्य आमदार उपस्थित होते. त्यामुळे युतीत खडा पडला या वावड्या तुम्हीच उठवल्या आहेत, असा खुलासाही श्रीकांत शिंदे यांनी केला.

- Advertisement -

शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा भाजपचा ठराव

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघात शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने केला आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेसोबत काम करायचे नाही, असे भाजपने ठरवले आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा हा ठराव होता. शिवसेनेसोबत काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असेही ठरावातून मांडण्यात आले. त्याला सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि तो ठराव मंजूर झाला. आतापर्यंत चर्चा होणे आणि प्रत्यक्ष ठराव करण्यापर्यंत विषय जाणे हे गंभीर आहे, असे मत मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले. मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. परिणामी बागने यांच्याविरोधात नव्हे तर अशा प्रवृत्तीलाच विरोध करायला हवा, असेही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते.

युतीत मिठाचा खडा टाकू नका, मी राजीनामा द्यायला तयार

युतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करु नये. कोणीही आम्हाला आव्हान देण्याचं काम करु नये. विचारपूर्वक आव्हानं करावीत, अशी भूमिका शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या शुक्रवारी माडंली. शिवसेनेला मदत न करण्याचा व त्यांच्या कोणत्याच कार्यक्रमाला न जाण्याचा ठराव भाजपने केला आहे. त्यावर श्रीकांत शिंदे यांनी ही भूमिका मांडली. श्रीकांत शिंदे म्हणाले, मीही एकलं आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजप निवडणार आहे. उमेदवार कोण असेल हे वरिष्ठ पातळीवर ठरेल. मला जनतेने मोठ्या मतांनी निवडून दिलं आहे. तरीही काही आक्षेप असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. कोणीही उमेदवार द्या. मी त्याचा प्रचार करायला तयार आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -