घरमहाराष्ट्रप्रमोद महाजनांना भावाने का मारले, हे जाहीर करु का? जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

प्रमोद महाजनांना भावाने का मारले, हे जाहीर करु का? जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

Subscribe

भाजपच्या खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना महाभारतातील शकुनी मामाची उपमा दिल्यानंतर आता त्याच्यावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता ट्विटरवरून पूनम महाजन यांना आव्हान दिले आहे. “दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण महाजनने गोळ्या का झाडल्या? हे कदाचित जगाला माहीत नसेल. पण, यामागील अंतर्गत राजकारण मला माहिती आहे. त्यामुळे आमच्या बापाबद्दल (शरद पवार) बोलाल तर खबरदार… सभ्यता सोडायला एक मिनिटही लागणार नाही” अशा शब्दात आव्हाड यांनी पूनम महाजन यांना प्रत्युत्तर दिले आहे.

हे वाचा – ‘पूनम महाजन आतापर्यंत डोळ्यांवर पट्टी बांधून होत्या’, रोहित पवारांचे प्रत्युत्तर
- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -