घरमुंबईधक्कादायक! भारतीय सैनिकांचे औषधे मुंबई-ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला

धक्कादायक! भारतीय सैनिकांचे औषधे मुंबई-ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये विक्रीला

Subscribe

भारतीय लष्करातील सैनिकांना दिले जाणारे औषध मुंबई-ठाण्यातील बाजारपेठांमध्ये मिळत असल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार एफडीआयच्या कारवाईतून समोर आला आहे.

आर्मी आणि नेव्हीतील सैनिकांना देण्यात येणाऱ्या औषधांची विक्री मुंबई आणि ठाण्यातील खुल्या औषध बाजारात केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. एफडीएच्या इंटिलंजन्स ब्युरोने भायखळा, मुलुंड, सानपाडा, तळोजा आदी ठिकाणी ही कारवाई केली आहे. दरम्यान, देशाला सुरक्षा देणाऱ्या सैनिकांच्या औषधांचा देखील काळाबाजार करुन खुल्या बाजारात विक्री होत असल्याची धक्कादायक घटना या निमित्ताने उजेडात आली आहे. नोव्हेंबर महिन्यात इतर राज्यातील सरकारी हॉस्पिटल्समध्ये गरीब रुग्णांसाठी देण्यात येणारी औषधे मुंबई ठाण्यात खुल्या बाजारात विकली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

औषध विक्रेत्यांविरोधात कारवाईची मागणी

भारतीय सेनादलातील सैनिकांना पुरवण्यात येणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होणे ही गंभीर बाब आहे. अशा व्यापाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंन्स होल्डर संघटनेकडून करण्यात येत आहे. ‘ज्या औषध विक्रेत्यांनी अवैध मार्गाने भारतीय सेना दलाची औषधे मुंबईच्या औषध बाजारात विक्रीसाठी आणली त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी. ज्या हॉस्पिटलमध्ये आणि औषधांच्या दुकानात, अशी औषधे विक्रीला ठेवण्यात आली आहेत, त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी’, अशी मागणीही करण्यात आली आहे.

अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये बहुतांश वेळा विभाग अधिकारी होलसेल औषधांवर कारवाई करत प्रकरण मिटवून टाकतात. पण, मुंबई ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये आणि औषध दुकानांमध्ये अशी अवैधरित्या मिळवलेल्या औषधांची विक्री सुरुच आहे. त्यामुळे , या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीबाआय मार्फत चौकशी व्हावी. या आधी २ फेब्रुवारीला भायखळ्यातून एफडीएने १८ लाख रुपये किंमतीची औधषं जप्त केली होती.
– अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अॅण्ड ड्रग्ज लायसंन्स होल्डर
- Advertisement -

‘या’ गोळ्या एफडीएने केल्या हस्तगत

सीटाग्लिप्टिन फास्फेट टॅबलेट्स आणि विल्डाग्लिप्टिन टॅबलेट्स या नावाच्या गोळ्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या गोळ्या फक्त डिफेन्स आणि नेवीतील जवानांना दिल्या जातात. विक्री साठी या गोळ्या उपलब्ध होत नाहीत. पण, निवान फार्मास्युटिकल्स गोळ्यांवर छापल्या जाणाऱ्या सूचनेला व्हायटनर आणि स्टीकर लावून मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात विक्री करत होते. एफडीएच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘या तपासात या गोळ्या सैनिकांना दिल्या जातात का किंवा नाही त्याचा अजून तपास सुरू आहे. पण, गोळ्यांवर लिहिलेलं फॉर डिफेन्स ही सूचना पुसून गोळ्यांची विक्री होत होती एवढं तपासात समोर आलेलं आहे. याप्रकरणी अधिक तपास एफडीएचे अधिकारी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -