घरमहाराष्ट्रकल्याण - डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या विळख्यातून स्कायवॉकने घेतला मोकळा श्वास 

कल्याण – डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या विळख्यातून स्कायवॉकने घेतला मोकळा श्वास 

Subscribe

कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी  स्कायवॉक  उभारण्यात आला आहे. मात्र स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरत असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल होऊन जात होते. त्यामुळे स्कायवॉक फेरीवाल्यांसाठी कि नागरिकांसाठी असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जायचा

केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी स्कायवॉक वरील फेरीवाल्यांविरोधात कारवाईचे आदेश दिल्यानंतर, पालिका प्रशासनाने कारवाईस सुरूवात केली आहे. फेरीवाल्यांना अंकुश ठेवण्यासाठी दोन्ही स्कायवॉक वर पोलिस तैनात ठेवण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांच्या विळख्यातून दोन्ही स्कायवॉकने मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे. मात्र फेरीवाल्यांच्या कारवाईत सातत्य असावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
 कल्याण डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी  स्कायवॉक  उभारण्यात आला आहे. मात्र स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरत असल्याने नागरिकांना चालणेही मुश्किल होऊन जात होते. त्यामुळे स्कायवॉक फेरीवाल्यांसाठी कि नागरिकांसाठी असा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जात असे. फेरीवाल्यांच्या गरड्यातून मार्गक्रमण करताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून केवळ दिखावूपणाची कारवाई करण्यात येत असे त्यानंतर जैसे थे अशीच परिस्थिती असायची.
फेरीवाल्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी नवे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारीच्या आधारे आयुक्तांनी  रात्रीच्या सुमारस दोन्ही स्कायवॉक ला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी स्कायवॉकवरील फेरीवाल्यांच्या त्रासाचा आयुक्तांनी स्वत: अनुभव घेतला.  आयुक्तांनी तात्काळ फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश संबंधित विभागाला दिले. तसेच फेरीवाल्यांवर कारवाईत हलगर्जी पणा करणाऱ्या दोन प्रभाग अधिकाऱ्यांसह फेरीवला हटाव पथकाच्या प्रमुखाला निलंबित केले.
आयुक्तांच्या या निर्णयामुळे धास्तावलेल्या अधिकारी कर्मचार्यांनी स्कायवॉक परिसरात फेरीवाल्यांविरोधात कारवाईची धडक मोहिम सुरू केली आहे. सततच्या कारवाइमुळे स्कायवॉक ची फेरीवाल्यांच्या गरड्यातून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे वर्ग करण्यात आलेले पोलीस कर्मचारी स्कायवॉक तैनात करण्यात आले आहे .त्यामुळे स्कायवॉक ने मोकळा श्वास घेतला आहे. या कारवाईमुळे नागरिकानां दिलासा मिळाला असून या कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -