घरमहाराष्ट्रkaruna sharma case: करुणा शर्मांच्या जामीनावरील निकाल राखून ठेवला, अंबेजोगाई सत्र न्यायालय...

karuna sharma case: करुणा शर्मांच्या जामीनावरील निकाल राखून ठेवला, अंबेजोगाई सत्र न्यायालय मंगळवारी देणार निर्णय

Subscribe

जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणातून सुटकेसाठी त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. याअर्जावर आज अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाच सुनावणी पार पडली. आज अंबाजोगाई सत्र न्यायालयात न्यायमूर्ती एस.एस. सापटनेकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली आहे. या सुनावणीदरम्यान कोर्टाने करुणा शर्मा यांचा जामीन अर्जावरील निकाल राखीव ठेवला आहे. या जामीन अर्जावर सुनावणीवर उद्या निकाल जाहीर होणार असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे करुणा शर्मा यांचा न्याय़ालयीन कोठडीत मुक्काम आणखी एक दिवस वाढला आहे.

यावेळी करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये. अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर केली आहे. आता या प्रकरणावर कोर्ट उद्या निकाल देणार आहे. करुणा शर्मा यांची १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी काल संपली आहे त्यामुळे त्यांना आता कारागृहामध्ये राहावा लागणार की जामीन मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. मात्र कोर्टाने जामीनावरील निकाल राखीव ठेवत उद्या निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

जातीवाचक शिवागाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. तेव्हापासून त्या न्यायालयीन कोठडीत आहे. १४ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या सुनावणीत कोर्टाने करुणा शर्मा यांची न्यायालयीन कोठडी १७ सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर या प्रकरणावर आज म्हणजेच १८ सप्टेंबरला सुनावणी होणार होती. मात्र कोर्टाकडे एकाच दिवशी २० जामीन अर्ज असल्याने करुणा शर्मा यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यानंतर आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी पार पडली.

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने शर्मा आणि त्यांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ५ सप्टेंबरला दुपारी शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आली होती. शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तसेच शर्मा यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

परळीत येऊन पत्रकार परिषद घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांचे खुलासे करणार असल्याचे करुणा शर्मा यांनी फेसबुकवरून जाहीर केले होते. त्यानुसार शर्मा परळीत पोहचल्या. मात्र मुंडे समर्थनांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगीनी विशाखा घाडगे यांनी ‘जातीवाचक शिवीगाळ का करतेस’ असा जाब विचारल्याने करुणा शर्मा यांनी बेबी छोटूमियां तांबोळी हिला खाली पाडून जखमी केले. तर शर्मांचा गाडी चालक अरुण दत्तात्रय मोरे याने चाकूने पोटावर वार केल्याची फिर्याद घाडगे यांनी दिली होती. यावरुन करुणा शर्मा व दत्तात्रय मोरे या दोघांवर अॅट्रॉसिटीसह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद झाला.


Russian University Firing : रशियन पर्म युनिवर्सिटीच्या अंधाधुंद गोळीबारात ८ ठार तर १४ जखमी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -