घरदेश-विदेशBank Holiday: सप्टेंबरअखेर १० पैकी ४ दिवस बँका बंद!

Bank Holiday: सप्टेंबरअखेर १० पैकी ४ दिवस बँका बंद!

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये तब्बल १२ दिवसांसाठी बँकांना सुट्टी आहे. RBI च्या अधिकृत यादीनुसार, सप्टेंबर महिन्यात ७ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यासोबतच चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार मिळून सप्टेंबरमध्ये एकूण १२ दिवसांसाठी बँका बंद राहणार आहेत. मात्र आता सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपला असून अवघ्या काही दिवसात ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. सप्टेंबरमध्ये एकूण १२ दिवस सुट्टी असल्याने कित्येकदा बँकेच्या कामावर त्याचा परिणाम सुद्धा झाला आहे. सप्टेंबर महिना संपण्यासाठी केवळ १० दिवस बाकी आहेत, परंतु या १० दिवसांतही बँकेचे काम ४ दिवस प्रभावित होणार आहे. म्हणजेच बँकांमध्ये साधारण ४ दिवस सुट्टी असणार आहे.

असे सांगितले जाते की, RBI नं ‘Holiday under Negotiable Instruments Act’ कॅटेगरी अंतर्गत सप्टेंबर महिन्यातील बँक हॉलिडे ठरवले जातात. या सात दिवसांत वेगवेगळ्या राज्यांतील सण-उत्सव, धार्मिक समारंभांचा विचार करुन सुट्ट्यांचा समावेश केला आहे. आठवडा सुट्ट्या वगळून RBI च्या सुट्ट्यांची यादी ही सर्वच बँकांसाठी लागू नसते. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांतील सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. त्यामुळे जर तुम्हाला येत्या काही दिवसांत बँकेत काही काम करायचे असेल तर तुम्हाला सुट्ट्यांनुसार नियोजन करावे लागणार आहे. या सुट्ट्या देशातील विविध राज्यांच्या आधारावर आहेत, त्यामुळे रविवार, शनिवार वगळता आपल्या राज्यांमध्ये सुट्ट्या नसू शकतात. येत्या १० दिवसात बँका कुठे आणि केव्हा बंद असतील जाणून घ्या…

- Advertisement -

१९ सप्टेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद होत्या. यानंतर २० सप्टेंबर म्हणजे आजही काही ठिकाणी सुट्टी आहे. गंगटोकमधील इंद्रराज यात्रेनिमित्त सोमवारी बँका बंद राहतील. या व्यतिरिक्त श्रीनारायण गुरू समाधी दिनामुळे तिरुअनंतपुरम आणि कोची येथील बँका २१ सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी बंद राहतील. मात्र, उत्तर भारतात सोमवार आणि मंगळवारी बँकांचे कामकाज सुरू राहणार आहे. याशिवाय २५ आणि २६ सप्टेंबर रोजी बँकांना सुट्टी असणार आहे. २५ सप्टेंबर हा महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी आहे, तर २६ सप्टेंबर रविवार असल्यामुळे सुट्टी असणार आहे.

२० सप्टेंबर : इंद्रजत्रा – (गंगटोक)
२१ सप्टेंबर : श्री नारायण गुरु समाधी दिवस – (कोची आणि तिरुअनंतपुरम)
२५ सप्टेंबर : चौथा शनिवार
२६ सप्टेंबर : रविवार

- Advertisement -

महाराष्ट्रात २५ आणि २६ सप्टेंबर या दिवशी बँका बंद राहणार आहेत. या शिवाय चार रविवार आणि दुसरा, चौथा शनिवार या दिवसांची सुट्टी कायम असेल. तर ऑक्टोबर महिन्यात एकूण सात दिवस बँका बंद राहतील. यामध्ये २ ऑक्टोबर (गांधी जयंती), १३ ऑक्टोबर (महा अष्टमी), १५ ऑक्टोबर (दसरा), १८ ऑक्टोबर (ईद-ए-मिलान) इत्यादी सुट्टी असणार आहे.


Russian University Firing : रशियन पर्म युनिवर्सिटीच्या अंधाधुंद गोळीबारात ८ ठार तर १४ जखमी

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -