घरमहाराष्ट्रजम्पिंग फुगा उंच उडून चिमुकल्याचा मृत्यू

जम्पिंग फुगा उंच उडून चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

हिंगोली येथे जम्पिंग फुग्यामुळे एका १० वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हिंगोली येथे जम्पिंग फुग्यामुळे एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोहर मोरे (१०) असे या मुलाचे नाव आहे. हिंगोलीमध्ये कण्हेरगाव येथे ही घटना घडली आहे. हा मुलगा जम्पिंग फुग्यामध्ये खेळत असताना जनरेटरसह हा बलून १०० फूट उंच उडाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये मनोहरचा मृत्यू झाला असून चार चिमुकले गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल केले असून जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमके काय घडले?

हिंगोली येथील कण्हेरगावामध्ये संगमेश्वर भागवत सप्ताहानिमित्त यात्रा भरली होती. या यात्रेमध्ये इतर पाळण्यासोबत जम्पिंग फुग्याचा देखील समावेश होता. बऱ्याच मुलांना या फुग्यामध्ये उड्या मारायला आवडतं. अनेक मुल या फुग्यामध्ये खेळत होती. अचानक हा जम्पिंग फुगा जनरेटरसह १०० फूट उंच उडाला आणि एकच खळबळ उडाली. हा फुगा उंच उडून खाली आदळला. दरम्यान, या फुग्यामध्ये असणाऱ्या मनोहर मोरे या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून चार मुल जखमी झाली आहे. हा फुगा मिकीमाऊस आकाराचा असल्याची माहिती समोर आली असून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -