घरमहाराष्ट्रलातूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, ११ दुकाने फोडली

लातूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, ११ दुकाने फोडली

Subscribe

लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील मौजे हाळी हंडरगुळ येथे चोरी करून तब्बल ११ दुकान फोडून त्या गल्ल्यातील रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

चोरी झाल्याचे घटना या दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. त्याच दरम्यान एक घटना समोर आली ती म्हणजे, लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील मौजे हाळी हंडरगुळ येथे चोरी झाल्याची घटना समोर आली आहेत. मौजे हाळी हंडरगुळ येथे तब्बल ११ दुकान चोट्यांनी फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पूर्ण उदगीर तालुक्यात एकच खणबळ उडाली आहे. दुकानामधील रोख रक्कम घेऊन चोरटे पळून गेले आहेत. मात्र, ते चोरटे चोरी करताना सिसिटीव्हीमध्ये कैद झाल्याचे उघड झाले आहे.

दुकानातील रक्कम लंपास

मौजे हाळी हंडरगुळ येथील बाजारपेठेतील बाळू धुप्पे यांचे गंगासागर जनरल स्टोअर्सचे शटर तोडून गल्ल्यामधील १२०० रूपये चोरले आहे. मनोज महाजन यांचे किराणामालाचे दुकान फोडून त्या दुकानातील गल्लामधील ५० हजाप रूपये चोरले आहेत. काळवने यांच्या किराणामाल दुकानातून ८०० ते १२०० रूपये चोरले आहे. तर रेनके यांच्या दुकानातून ८००० रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.

- Advertisement -

सिसिटीव्हीच्या माध्यमातून शोध चालू

दरम्यान, काही दुकानाना सिसिटीव्ह असल्यामुळे सिसिटीव्ही फुटेजमध्ये तीन युवक दुकानांचे शटर तोडताना आढळून आले. दुकानदारांना चोरीची कल्पना येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे दुचाकी वाहानावरून फरार झाले. दुकानदारांच्या तावडीत सापडले नाही. सिसिटीव्हीच्या माध्यमातू वाढवणा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण सोमवंशी लवकरच चोरट्यांचा शोध घेतला जाईल असे सांगत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -