घरताज्या घडामोडीKolhapur Express cancellation : कोल्हापूरकरांनो महत्त्वाची बातमी ! कोल्हापूर - मिरजेतून सुटणाऱ्या...

Kolhapur Express cancellation : कोल्हापूरकरांनो महत्त्वाची बातमी ! कोल्हापूर – मिरजेतून सुटणाऱ्या ‘या’ ६ एक्सप्रेस कायमस्वरुपी रद्द

Subscribe

एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने रेल्वेना हा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात या एक्सप्रेस बंद झाल्या होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर या एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या. मात्र एक्सप्रेस पुन्हा सुरू न करता थेट कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  

 Kolhapur Express cancellation : कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर आणि मिरज येथून सुटणाऱ्या तब्बल ६ एक्सप्रेस कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागल्याने रेल्वेना हा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात या एक्सप्रेस बंद झाल्या होत्या. निर्बंध शिथिल झाल्यानंतर या एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक संघटना पुढे आल्या होत्या. मात्र एक्सप्रेस पुन्हा सुरू न करता थेट कायमस्वरुपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या एक्सप्रेस कायमस्वरुपी रद्द

  • कोल्हापूर – मुंबई सह्याद्री एक्सप्रेस
  • कोल्हापूर – बिदर एक्सप्रेस
  • कोल्हापूर – सोलापूर एक्सप्रेस
  • कोल्हापूर – मणगूर एक्सप्रेस
  • मिरज – पंढरपूर एक्सप्रेस
  • मिरज – हुबळी एक्सप्रेस

कोल्हापूर रेल्वे स्थानक हे व्यापारासाठी त्याचप्रमाणे कोल्हापूरातून दक्षिणेकडे जाण्यासाठी त्याचप्रमाणे मुंबईत येण्यासाठी महत्त्वाचे स्थानक आहे. या एक्सप्रेस रद्द केल्याने कोल्हापूरातून मुंबईत येणाऱ्या किंवा दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसणार आहे. विविध संघटना आजही या एक्सप्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी करत आहेत. रद्द करण्यात आलेल्या एक्सप्रेस मधील काही एक्सप्रेस या पॅसेंजर ट्रेन म्हणून चालवण्यात येतील. १५० किलोमीटरपर्यंत या रेल्वे धावतील. मात्र लांब पल्ल्याच्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ६ गाड्यांचा भीषण अपघात, चार जणांचा…

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -