घरताज्या घडामोडीPunjab Election: 'मी दहशतवादी नाही, मुख्यमंत्री आहे!' हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारल्याने CM...

Punjab Election: ‘मी दहशतवादी नाही, मुख्यमंत्री आहे!’ हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारल्याने CM चन्नी संतापले

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचे हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी न दिल्यामुळे पुन्हा एकदा पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. तसेच यामुळे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी देखील संतापले आहेत. ते म्हणाले की, ‘फिरोझपूरमध्ये शेतकऱ्यांवर लाठ्या चालवल्या नाहीत म्हणून मला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ तसेच केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करत चन्नी यांनी ते खोट असल्याचे सांगत दावा केला की, ‘केजरीवाल आपले मुख्यमंत्री उमेदवार भगवंत मान यांना हरवू इच्छित आहेत.’

‘मी दहशतवादी आहे?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली नंतर जालंधरमध्ये एका वृत्तवाहिनीशी बातचित करताना मुख्यमंत्री चन्नी म्हणाले की, ‘आज मला उडण्यापासून रोखले आहे. संपूर्ण दिवस मला प्रचार करायला दिला नाही, कारण पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम होता. मी काय दहशवादी आहे? जर मी फिरोझपूरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला असता तर सर्व काही ठिक असते. पंतप्रधानांनी स्वतः २०१४ उल्लेख केला, जेव्हा त्यांना परवानगी दिली नव्हती. हे सर्वकाही मला रोखण्यासाठी केले जात आहे.’

- Advertisement -

कॅप्टनचा हवाला देत पंतप्रधानांनी काँग्रेसवर केलेल्या हल्ल्यावर चन्नी म्हणाले की, ‘अमरिंदर सिंह यांना पंजाबच्या लोकांनुसार चालायला पाहिजे. त्यांनी लोकांची कामे केली नाहीत, आश्वासने पूर्ण केली नाहीत. नेहमी भाजप-अकालीला भेटत राहिले त्यामुळे नुकसान झाले.’ तसेच वाळू माफियासंदर्भातील आरोपांवर चन्नी म्हणाले की, ‘हे खोटे आरोप लावतात आणि नंतर माफी मागतात. हे मूर्ख लोक आहेत. राज्यपालांकडे तक्रार केली, त्यामध्ये आरोप खोटे आढळले.’


हेही वाचा – युवराजांसाठी 2014 मध्ये मला हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापासून रोखण्यात आले, मोदींचा पंजाबमधून…

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -